पुणे

स्वातंत्र्यदिनानिमित्त कोथरूडला मॅरेथॉन

CD

पुणे, ता. १० : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त ‘सामाजिक ऐक्य, स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य’ या तत्त्वांचा पुरस्कार करणारी ‘एटेनेक्स इंडिपेंडन्स डे रन मॅरेथॉन’ कोथरूड येथे शुक्रवारी (ता. १५) सकाळी ४.३० वाजता होणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू बायचुंग भुतिया उपस्थिती राहणार आहेत. ‘सकाळ माध्यम समूह’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहेत. डीपी रस्त्यावरील केशवबागपासून सुरू होणाऱ्या या शर्यतीत शहरातील विविध वयोगटांतील तीन हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा ३, ५ आणि १० किलोमीटर या प्रकारात होणार आहे. केशवबाग- मातोश्री चौक- नळ स्टॉप- दशभुजा गणपती- कर्वे पुतळा (यूटर्न)- पुन्हा करिष्मा चौक ते केशवबाग हा स्पर्धेच्या मुख्य (१० किलोमीटर) शर्यतीचा मार्ग आहे.
तसेच या स्पर्धेत ‘फन रन’, ‘किड्स रन’ यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ‘वॉकेथॉन शर्यत’ देखील होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला एटेनेक्सचा टी-शर्ट, गुडी बॅग, नाश्ता, हायड्रेशन व रूट सपोर्ट, गिफ्ट व्हाऊचर, ई-सर्टिफिकेट तसेच फिनिशर मेडल दिले जाईल. स्पर्धेच्या १० किलोमीटर शर्यतीत पहिल्या क्रमांकाला ५० हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाला १५ हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला ७ हजार ५०० रुपये, अशी बक्षीसे मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Attack Case: वैद्यकीय चमत्कार! हार्टअटॅकने हृदयाचा एक भाग फाटला, रक्ताच्या गाठी जमा झाल्या... तरीही सोलापूरच्या डॉक्टरांनी वाचवले प्राण

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे एका व्यासपीठावर, फडणवीसही राहणार उपस्थित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला, CSKने तुक्का मारला अन् स्टार सापडला; एबी डिव्हिलियर्सने IPL फ्रँचायझीचे टोचले कान

HSRP Number Plate: 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख! HSRP नंबर प्लेटसाठी आजच अर्ज करा

BJP आमदाराच्या मुलाने रस्त्यात गाडी लावल्यानं वाहतूक कोंडी, पोलिसांशी हुज्जत घालत म्हणाला, चल निघ

SCROLL FOR NEXT