पुणे

मुळातच मी गणपती बाप्पाचा वेडा

CD

लहानपणापासूनच मला गणपती बाप्पाचे प्रचंड वेड आहे. आमच्या घरी गणपती बसत नाही म्हणून मी सदाशिव पेठ येथील आमच्या गल्लीतील ‘वंदे मातरम मंडळात सहभागी झालो. सर्व कार्यकर्त्यांमध्ये मी लहान असल्याने थोरामोठ्यांकडून कामे समजावून घेतली. आता मी मंडळाचा उत्सव प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मंडळाचे नाव नावारूपास कसे येईल, यासाठीच कटिबद्ध आहे. दहा दिवसांतील सजावट, आगमन सोहळा रथ आणि विसर्जन मिरवणूक रथ, याचे नियोजन व प्रत्यक्ष काम वेळेत व चांगले कसे होइल, हा माझा प्रयत्न असतो. मंडळ म्हटले की, सर्वच सदस्यांच्या विचारांना सन्मान देणे आवश्यक आहे. त्यातून सर्वांच्या विचारांची एक बांधणी करून कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास व सर्वांनाच संधी मिळावी, याला मी महत्त्व देत आलो आहे. मंडळातर्फे महापालिका सफाई कामगारांचा सत्कार करण्यात येतो. तसेच रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिर आदी वार्षिक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. मंडळाचे ‘अमृतमहोत्सवी वर्ष’ हे अतिशय प्रभावशाली, गौरवशाली, दिमाखदार पद्धतीने साजरे करण्याचा माझा व माझ्या मंडळाचा मानस असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : 12 वी च्या निकालात, बुलढाणा जिल्हाचा निकाल 95.22 % टक्के

Hasan Mushrif Statement : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया,” हसन मुश्रीफांनी शिवाजी पाटलांना थेट डिवचलं

Mumbai: पुनर्वसन ४० वर्षे रखडले; उच्च न्यायालयाचे केंद्र, ‘जेएनपीए’ला खडे बोल

Shahuwadi crime : कोल्हापुरातील मलकापूरमध्ये धक्कादायक घटना; सख्या भावानेच केला भावाचा खून, भाऊ फरार

SCROLL FOR NEXT