पुणे

भारतीय संस्कृतीतून ज्ञानाचे संवर्धन

CD

पुणे, ता. १६ : ‘‘जगात भारतासह अन्य संस्कृतीदेखील प्राचीन आहेत. त्यातील केवळ भारतीय संस्कृतीच निरंतर आहे. कारण, भारतीय संस्कृतीचा भौतिकता नसून ज्ञान आहे. भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू एकात्मता आहे. आपली भारतीय संस्कृती विविधतेचा सन्मान करा आणि त्याचा स्वीकार करा, असे सांगते. भारतीय संस्कृती ज्ञान आणि प्रज्ञेच्या संवर्धनाची संस्कृती आहे,’’ असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात ‘पुणे लिट फेस्ट’चे उद्‌घाटन खान यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये झाले. यावेळी पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर उपस्थित होते.
अनेक संस्कृत श्लोक, उपनिषदांचा दाखला देत खान यांनी साहित्य, वाचन आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. खान म्हणाले, ‘‘देशातील ज्ञानाचा प्रसार होईल, तितका तो देश प्रगती करतो. ‘ऋग्वेदा’ला युनेस्कोने सर्वांत प्राचीन ग्रंथ मानले आहे, यापेक्षा भारतीय संस्कृती प्राचीन असल्याचे सांगण्यासाठी अन्य पुराव्याची गरज नाही. अरबांनी भारतीय संस्कृतीवर आधारित साहित्य पहिल्यांदा अनुवादित केले. युरोपच्या अवकाशशास्त्रातील प्रगती, विकास हे ‘सूर्य सिद्धांत’ या ग्रंथावर आधारित आहे. हा ग्रंथ अरबीतून युरोपात गेला; परंतु आपलेच ज्ञान आपल्या ज्ञानाचा आधार ठरत नाही, ही बाब चिंताजनक आहे.’’
‘‘पुस्तके ही माझे पहिले प्रेम आहे. पुस्तकाने ज्ञानार्जनाचा मार्ग अधिक सोपा केला आहे, असे खान यांनी वाचनाबद्दल बोलताना सांगितले. यावेळी मराठे, पांडे यांनी विचार मांडले.

‘...तर जगाचे सध्याचे रूप वेगळे असते’
‘‘जगात होणाऱ्या युद्धाला, हिंसेला आपण जबाबदार आहोत. दुनियातील सर्व संस्कृती रंग, आस्था, भाषावर आधारावर परिभाषित होतात. जगात केवळ भारतीय संस्कृती अशी आहे की, जी आत्म्यावर आधारित आहे. स्वामी विवेकानंद सातत्याने सांगत होते की ‘भारताकडे जगाला देण्यासारखा संदेश आहे’. ‘तुम्ही ज्याला मारत आहात, तो तुम्हीच आहात’, असा आपल्या संस्कृतीमधील संदेश जगाला दिला असता, तर जगाचे सध्याचे रूप काही वेगळे असते; पण आपण यात अयशस्वी झालो,’’ असे मत खान यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ महिने आधी समजणार वेळापत्रक; विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये, द्वितीय सत्र परीक्षा मार्चअखेर

विशेष : शब्दांपासून आकर्षक आकृतीपर्यंत

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

SCROLL FOR NEXT