भेकराईमाता विद्यालयात पालखी सोहळा
पुणे, ता. १ : श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे वैशिष्ट्य असलेल्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात, हाती वैष्णवांची पताका घेऊन सहभागी झाले होते. मुख्याध्यापक डॉ. सुनील कामठे, उपमुख्याध्यापक संपत मेमाणे, पर्यवेक्षक सुनील दीक्षित, एकनाथ देशमुख, सविता दुर्गे, प्रसन्न धर्माधिकारी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून सोहळ्यास सुरवात झाली. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी फुगडी खेळत सोहळ्यात रंगत आणली. कपाळी बुक्का आणि चंदनाचा टिळा, हातात टाळ, गळ्यात तुळशीच्या माळा, भक्तिरसात न्हालेले मन, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या नामांचा जयजयकार, विठू नामाचा जयघोष असे दृश्य विद्यार्थी आणि पालकांना ‘याची देही याची डोळा’ विद्यालयात अनुभवता आले. विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यातील रिंगण पूर्ण केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन पर्यावरण दिंडी, साक्षरता दिंडी आणि व्यसनमुक्तीचे संदेश दिला. मल्हार ग्रुपच्या वतीने विशाल कामठे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. प्रवचनकार विद्यार्थिनी गौरी जाधव हिने प्रवचन सादर केले. श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट, फुरसुंगीच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मराठे विद्यालयात मंत्रिमंडळ निवडणूक
पुणे : गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात आला. निवडणुकीनंतर लगेचच मतमोजणी झाली. निवडून आलेल्या सर्व सदस्यांना शालेय मंत्रिमंडळ बॅच वाटप व शाळेचे नेमणूक पत्र पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. शाळेत मुख्यमंत्री, शिस्त मंत्री, अभ्यासमंत्री, सांस्कृतिक मंत्री, आरोग्य मंत्री, स्वच्छता मंत्री, ग्रंथालय मंत्री व क्रीडामंत्री असे एकूण आठ मुले व आठ मुली यांची निवड मतदारांनी केली. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त व मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांनी सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना शपथ दिली. या प्रक्रियेत विद्यार्थिनींनीही उत्कृष्ट असा सहभाग नोंदवला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे, शालेय समिती अध्यक्ष प्रा. अलका पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, दिलीप देवकर, समीर खुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.