पुणे, ता. १ ः राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात असून, बरे होण्याचे प्रमाण ९४.५६ टक्क्यांवर पोहोचले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात एकूण २९ हजार ७५७ चाचण्या केल्या असून, त्यापैकी २ हजार ५०१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यापैकी २ हजार ३६५ रुग्ण म्हणजेच ९४.५६ टक्के पूर्णपणे बरे झाले आहेत.
सध्या राज्यात केवळ ९८ सक्रिय रुग्ण असून बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. ३० जून रोजी एकाच दिवशी १३ नवीन रुग्ण नोंदविण्यात आले. यामध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर, रायगड व इतर महानगरपालिकांमधील रुग्णांचा समावेश आहे. राज्य सरकारने इन्फ्लूएंझासदृश लक्षणे (आयएलआय) आणि गंभीर श्वसन संक्रमण (सारी) असणाऱ्या रुग्णांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या तपासण्या आणि नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवले जात आहेत. यापैकी ३८ जणांचा मृत्यू झाला असून ते सहव्याधीग्रस्त होते. त्यांच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, यकृत व मूत्रपिंडाचे आजार, पक्षाघात, मेंदुज्वर अशा गंभीर स्थिती दिसून आल्या होत्या. दरम्यान, राज्याच्या साथरोग विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.