पुणे

कोंढव्यात अभियंता तरुणीवर बलात्कार

CD

पुणे, ता. ३ : ‘कुरिअर बॉय’ म्हणून घरी आलेल्या तरुणाने एका २२ वर्षीय संगणक अभियंता तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारत बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी सायंकाळी घडली. त्यानंतर आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढत ‘मी पुन्हा येईन’ अशी धमकीही दिली. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ६४, ७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचे भासवून सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोसायटीत प्रवेश मिळवला. तरुणी अकराव्या मजल्यावर घरी एकटीच होती. आरोपीने घरी जाऊन ‘बँकेतून कुरिअर आले असून पोच द्या, माझ्याकडे पेन नाही,’ असे सांगितले. मात्र, तरुणी म्हणाली की, ‘कुरिअर माझे नाही,’ तरीही त्याने ‘सही करावी लागेल’ असा आग्रह धरला. त्यामुळे तिने सेफ्टी डोअर उघडला. तरुणी पेन घेण्यासाठी घरामध्ये आत गेली, त्याच क्षणी आरोपीने तरुणीच्या घरात प्रवेश केला. तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारून बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी साधारण पाऊणतास घरामध्ये होता. तासाभरानंतर शुद्धीवर आल्यानंतर तरुणीने तिच्या ओळखीच्या शिक्षिकेला हा प्रकार सांगितला. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली.
ही तरुणी महाराष्ट्रातीलच असून एक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहे. ती सध्या कल्याणीनगर येथील एका आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरीस आहे. ती भावाच्या शिक्षणासाठी कोंढवा परिसरात राहत होती. भाऊ बाहेरगावी गेल्यामुळे ती घरी एकटीच होती. तरुणीच्या मोबाईलमध्ये एक छायाचित्र आढळले असून त्यात आरोपीने ‘मी पुन्हा येईन’ असे लिहिले आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास ते छायाचित्र व्हायरल करण्याची धमकीही दिली आहे. सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

साधारण घटनाक्रम
आरोपी तरुण बुधवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास सोसायटीत आला. त्यानंतर तो आठ वाजण्याच्या सुमारास सोसायटीतून बाहेर पडला. साडेआठच्या सुमारास शुद्धीवर आलेल्या तरुणीने ओळखीच्या शिक्षिकेस हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस नऊ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT