पुणे

पोलिसांच्या गृहनिर्माणास गती द्यावी : सिद्धार्थ शिरोळे

CD

मुंबई, ता. ८ : महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण महामंडळास अधिकृत विकसक म्हणून नेमल्यास पोलिस वसाहतींच्या उभारणीस गती येईल, अशी भूमिका आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधिमंडळाच्या सभागृहात मांडली. राज्यभरातील पोलिस वसाहतींची स्थिती दयनीय असून, काही ठिकाणी नव्याने बांधकामांची आवश्यकता निर्माण झाली आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राज्यातील अनेक पोलिस वसाहती जुनाट आहेत. त्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे वेळखाऊ आणि खर्चिक ठरत आहेत. अशा परिस्थितीत पोलिस गृहनिर्माण महामंडळाला विकसक म्हणून नेमल्यास, पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार वसाहती मिळण्यास मदत होईल, असे आमदार शिरोळे म्हणाले.

दरम्यान, पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक (मोटर परिवहन विभाग) यांच्या जागेचे पुणे महापालिकेस हस्तांतरित करणे अद्याप बाकी आहे. या जागेच्या हस्तांतरामुळे वाहतुकीच्या अडचणी कमी होतील. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : ब्रेक फेल अन् भीषण थरार! स्कूल बसने 8 गाड्यांना चिरडले, अपघाताचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल..

दक्षिण आफ्रिकेने १ डाव व २३६ धावांनी झिम्बाब्वेवर विजय मिळवला; पण, उपयोग काय? WTC 2025-27 मध्ये एकही गुण नाही मिळाला

Latest Maharashtra News Live Updates: कांदिवलीत एटीएम सेंटरला लागली आग

Laxmi Blessings: 20 जुलैपर्यंत लक्ष्मीमातेची विशेष कृपा! या 2 राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि सौख्य

Crime News : कॅन्सरग्रस्त पतीला पत्नीनं गरम तेलातल्या झाऱ्याने केली मारहाण, कारण तर अगदी क्षुल्लक..

SCROLL FOR NEXT