South Africa won by an innings and 236 runs: दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेवर १ डाव व २३६ धावांनी विजय मिळवत मालिका २-० अशी जिंकली. कर्णधार वियान मुल्डरच्या नाबाद ३६७ धावांच्या जोरावर आफ्रिकेने पहिला डाव ५ बाद ६२६ धावांवर घोषित केला. त्यानंतर झिम्बाब्वेला पहिल्या डावात १७० धावांवर गुंडाळून आफ्रिकेने फॉलोऑन दिला आणि दुसऱ्या डावात त्यांना २२० धावांवर गुंडाळले. पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या मागील पर्वातील विजेत्या आफ्रिकेला या विजयाचा WTC 2025-27 मध्ये काहीच उपयोग होणार नाही.