पुणे

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठात आंदोलन

CD

पुणे, ता. १४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१९ पॅटर्नच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना एक-दोन विषयांत नापास झाल्यामुळे वर्ष वाया जाणार आहे. विद्यार्थ्यांचे हे नुकसान रोखण्यासाठी आणि त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी नॅशनल स्टुंडट्स युनियन ऑफ इंडिया, विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांसह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
यावेळी कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर चढले. त्यानंतर प्रवेशद्वार उघडून आंदोलनकर्ते विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ आले. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव अक्षय जैन, विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, तेजस बनसोड, अभिषेक पवार आदी उपस्थित होते.
अमरावती विद्यापीठाने ‘कॅरी ऑन’चा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठानेही तत्काळ असा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी, अशा मुख्य मागणी हे आंदोलन करण्यात आले. याशिवाय, विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेत लागावेत, चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले ग्रेस मार्क्स आणि गुण पडताळणीतील त्रुटी दूर कराव्यात अशा मागण्याही करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी ‘कॅरी ऑन’ किंवा पुरवणी परीक्षेसंदर्भात निवेदन सादर केले आहे. अशी मागणी करणारे विद्यार्थी त्या-त्या वर्षात किमान ५० टक्के श्रेयांक प्राप्त करू शकलेले नाहीत. परिणामी विद्यापीठ नियमानुसार हे सर्व विद्यार्थी त्या-त्या शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या मागणीसंदर्भात विद्यार्थीहिताच्या दृष्टीने विचार करून या संदर्भातील कायदेशीर बाबी आणि संबंधित शिखर संस्थांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. प्रभाकर देसाई, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठ प्रशासन नेहमीच विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यार्थी हिताचे निर्णय घेत असते. विद्यापीठाने याआधी विशिष्ट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, असे निर्णय घेतले आहेत. यावेळीही कायदेशीर सल्ला घेऊन आणि नियमांच्या अधीन राहून निर्णय घेतला जाईल.
- डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital India Reel Contest: Big News : ...तर ‘Reel’ बनवणाऱ्यांना मिळवता येणार सरकारकडून १५ हजार रुपये!

Traffic Police Video : ट्रॅफिक पोलिसांना भरचौकात लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुंबईकरांचा संताप, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

सदाशिव अमरापूरकरांना सिद्धार्थ जाधव मुळीच आवडत नव्हता... लोकप्रिय दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले, 'ते हिंदीत काम करत होते म्हणून...'

Dhule Municipal Corporation : धुळे महापालिका आता ‘इलेक्शन मोड’वर!; आयुक्तांकडून मतदान केंद्र व्यवस्थेचा आदेश

Viral: जिद्द जगण्याची! तरुण वादळात हरवला, ५ दिवस समुद्रात पोहत राहिला, पावसाचं पाणी प्यायला, नंतर 'असा' वाचला जीव

SCROLL FOR NEXT