पुणे

जिल्हा परिषद गट-गण रचनेचे प्रारूप जाहीर

CD

पुणे, ता. १४ : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७३ गट आणि १४६ गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आला. या आराखड्यानुसार जुन्नर, खेड आणि इंदापूर या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी आठ सदस्य असणार आहे. त्यामुळे ७३ पैकी २४ सदस्य या तीन तालुक्यांत असणार आहे, तर सर्वांत कमी म्हणजे दोन जिल्हा परिषद सदस्य संख्या ही राजगड (वेल्हा) तालुक्यात असणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट-गण रचनेची अधिसूचना सोमवारी काढून ती जाहीर केली. १३ तहसील कार्यालयाबरोबरच पंचायत समिती कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात आली. २०११ची जनगणना ग्राह्य धरून ही प्रारूप रचना करण्यात आली आहे. गट-गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध झाल्याने ग्रामीण भागांत कोणत्या गटात-गणात कोणते गाव आले आहे, हे स्पष्ट झाल्याने इच्छुकांची मोर्चेबांधणी करणे सोईचे झाले आहे. या प्रारूप गट-गण रचनेवर २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे नागरिकांना हरकती, सूचना नोंदविता येणार आहे.

महत्त्वाचे
- जिल्ह्यात २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ७५ होती
- २०१७ नंतर हवेली आणि मुळशी तालुक्यातील काही गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करण्यात आला
- उरुळी देवाची-फुरसुंगी या दोन्ही गावांची मिळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात आली
- त्याचा परिणाम जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समित्यांची सदस्यसंख्या कमी होण्यावर झाला
- हवेली तालुक्यात २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या१३ होती. आता ती सहावर आली आहे
- जुन्नर, खेड, दौंड, भोर आणि इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संख्येत एकने वाढ झाली आहे

अशी आहे सदस्य संख्या
तालुका - लोकसंख्या - जिल्हा परिषद सदस्यांची संख्या- पंचायत समिती सदस्यांची संख्या
जुन्नर----- ३,७३,९८७ ---- ८ -------१६
आंबेगाव---- २,१४,१३१ - ----५ ------१०
शिरूर-------- ३,४८,३०३----७ - १४
खेड------- ३,५१,७६६-----८-----१६
मावळ------ २,४८,२८५ ------ ५------१०
मुळशी ------- १,४९,२३५-----३ -----६
हवेली--------- २,६०,८२३-----६--------१२
दौंड-------- ३,३१,०४६--------७-------१४
पुरंदर------ १,८९,३२३ ------ ४ ---------८
राजगड ------ ५४,५१६------२-----४
भोर -------- १,६७,६६३-----४-------८
बारामती--------- ३,१७,७४९-----६ -----१२
इंदापूर --------- ३,५७,६६८-----८---------१६
एकूण ---- ३३,४८,४९५----७३-------१४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital India Reel Contest: Big News : ...तर ‘Reel’ बनवणाऱ्यांना मिळवता येणार सरकारकडून १५ हजार रुपये!

Love Story : शूटिंगदरम्यान झाली मैत्री, दहा वर्षांचं डेटिंग आणि लग्न; रितेश-जिनिलियाची भन्नाट गोष्ट

Power Supply: कल्याणमध्ये विजेचा खेळखंडोबा, महावितरणावर ठाकरे गट आक्रमक, आंदोलनाचा इशारा

Jalgaon News : जळगावात सरकारी कामात अडथळा; कारवाई टाळण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव

Katraj Zoo : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात १६ हरणांचा मृत्यू; वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण; तपासासाठी नमुने प्रयोगशाळेत

SCROLL FOR NEXT