
कल्याण : शहरात होणाऱ्या सततच्या भारनियमनामुळे नागरिक, व्यापारी, शाळा संस्था यांना मागील काही दिवसांपासून प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन जाब विचारण्यात आला आहे. समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेने दिला आहे.