पुणे

सुरक्षेसाठी ‘सीआयएसएफ’ सज्ज

CD

पुणे, ता. २६ : देशातील संवेदनशील व महत्त्वाच्या स्थळांवर सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बदलत्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘सीआयएसएफ’ने आता ‘बॅटल रेडी’ होण्यासाठी भारतीय लष्करासोबत संयुक्त विशेष प्रशिक्षण सुरू केले आहे.

हे प्रशिक्षण ‘सीआयएसएफ’च्या क्षमतेत वाढ करणारे ठरणार आहे. ‘बॅटल रेडी’ या उपक्रमांतर्गत ‘सीआयएसएफ’चे जवान काश्मीर खोऱ्यातील लष्कराच्या तळांवर नाईट ऑपरेशन्स, जंगल वॉरफेअर, क्लोज-कॉम्बॅट टेक्निक्स आणि एंड्युरन्स ड्रिल्ससारख्या अत्याधुनिक युद्धतंत्रांचे प्रशिक्षण घेत आहेत. ‘सीआयएसएफ’च्या जवानांना विमानतळ, अणुऊर्जा प्रकल्प, संसद भवन, मोठ्या सरकारी इमारती यांसारख्या उच्च-संवेदनशील ठिकाणी कोणताही अचानक धोका उद्‌भवल्यास जलद आणि अचूक प्रतिसाद देण्याची क्षमता मिळावी, हा यामागील उद्देश्य आहे.

आत्मविश्वास आणि सज्जता वाढवणारे प्रशिक्षण
या प्रशिक्षणामुळे जवानांची मानसिक ताकद, शारीरिक सहनशक्ती आणि रणनैतिक कौशल्य मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. खास करून ड्रोन हल्ले, एकाचवेळी होणारे दहशतवादी हल्ले व तोडफोडीच्या घटनांना तोंड देण्यासाठी ‘सीआयएसएफ’ची सज्जता वाढवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : कोरियन व्लॉगरसोबत भारतात घडली भयंकर घटना; “I hate India” म्हणत ढसाढसा रडली, तिच्यासोबत झालेल्या छळाचा व्हिडिओ व्हायरल

Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टीत जावई अडकला; Eknath Khadse बघा काय म्हणाले? | Sakal News

एक-दोन नव्हे ३ ठिकाणी रंगली रात्र, खराडीआधी पब अन् फाइव्ह स्टारमध्ये पार्टी, छाप्यापर्यंत काय घडलं? टाइमलाइन आली समोर

Chh. Sambhajinagar News : मुलींना पालकांकडे परत पाठविण्याची घाई; विद्यादीप प्रकरणानंतर महिला बालविकास क्षेत्रात ‘भीती’

Latest Maharashtra News Updates: भुगावजवळ रस्त्यावर झाड कोसळले; गाडीत अडकलेले चौघे सुखरूप

SCROLL FOR NEXT