पुणे

पुण्यात हलक्या पावसाची शक्यता

CD

पुणे, ता. २९ : शहर आणि परिसरात मंगळवारी (ता. २९) हलक्या पावसाने हजेरी लावली. पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसल्याने पुढील दोन ते तीन दिवसांतदेखील शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर परिसरामध्ये हलक्या सरी कोसळल्या. परिणामी कमाल तापमानात देखील घट नोंदविण्यात आली. मंगळवारी (ता. २९) कधी पाऊस तर कधी ऊन असा खेळ सुरू होता. मंगळवारी शहरात २७ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान तर २१.९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. घाट विभागात देखील पावसाचा जोर ओसरला आहे. घाट विभागातील ताम्हिणी परिसरामध्ये गेल्या २४ तासात ७५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर बुधवारी (ता. ३०) तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पुण्याच्या घाट विभागात ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि परिसरात बुधवारी (ता. ३०) कमाल तापमानात किंचित वाढ होणार असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस इतके तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असून अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गुरुवारी (ता. ३१) कमाल तापमान स्थिर राहून त्यानंतर दोन दिवसांत कमाल तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता आहे. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार असून आकाश अंशतः ढगाळ राहून अति हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction on Trump tariff: ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर फोडलेल्या टॅरिफ बॉम्बनंतर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका!

Jaya Bachchan warn Priyanka Chaturvedi: जया बच्चन राज्यसभेत बोलताना अचानक शेजारीच बसलेल्या प्रियंका चतुर्वेदींवर उखडल्या, म्हणाल्या...

Trumps Tariff Bomb: ट्रम्प 'टॅरिफ'मुळे भारताच्या टेक्सटाईल्स, फार्मासह 'या' ५ उद्योगांना बसणार फटका, पाहा संपूर्ण लिस्ट

Amit Shah Rajya Sabha Speech: ‘माझ्याशी तर निपटा, पंतप्रधानांना कशाला बोलावताय, आणखी त्रास होईल’’

Prakash Solanke: प्रकाश सोळंकेंनी गळाला लावलेले बाबरी मुंडे नेमके कोण? पंकजांसह धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT