पुणे

मुद्रांक शुल्काचा परतावा १५ दिवसात मिळणार पुणे जिल्हा निबंधक कार्यालयाचा राज्यातील पहिला उपक्रम

CD

पुणे, ता. १ ः एखाद्या सदनिकेचा अथवा जमिनींचा व्यवहार ठरला....रजिस्ट्रेशनसाठी पैसे भरले....परंतु त्या आधीच तुमचा व्यवहार काही कारणांमुळे झाला नाही....तर भरलेल्या मुद्रांक शुल्काचा परतावा (रिफंड) मिळण्यासाठी अर्ज करण्यापासून ते पैसे मिळेपर्यंत तुम्हाला हेलपाटे मारावे लागतात. आता हा त्रास होणार नाही. कारण भरलेले शुल्क परत मिळण्याचा कालावधी पंधरा दिवसांवर आला आहे. महसूल दिनाच्या निमित्ताने सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडून ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. राज्यात अशी मोहीम राबविणारे हे पहिले कार्यालय ठरले आहे.
मुद्रांक शुल्काचा परतावा मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर नऊ ते बारा महिने इतका कालावधी लागत असे. गेल्या वर्षी हा कालावधी कमी करत जिल्हा निबंधक कार्यालयाने तो दीड महिन्यावर आणला. हा कालावधी आणखी कमी करण्यासाठी सह जिल्हा निबंधक कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेत मागील काही महिन्यांपासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढत हा कालावधी आता पंधरा दिवसांवर आणला आहे. परताव्याची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला.
एप्रिल ते डिसेंबर २०२३ मध्ये एकूण ८ हजार १७५ प्रकरणे प्रलंबित होती. ही सर्व प्रकरणे सह जिल्हा निबंधक कार्यालयाने जानेवारी २०२४ अखेर निकाली काढलेली आहेत. तसेच जानेवारी २०२४ ते जून २०२५ या कालावधीत प्राप्त आणि प्रलंबित असलेली परतावा प्रकरणे एकूण ३ हजार ५४ इतकी होती. ती याच कालावधीमध्ये निकाली काढली आहेत. जुलैपासून मुद्रांक शुल्क व नोंदणी फी परतावा प्रकरणे प्राप्त झाल्यापासून निकाली काढण्यासाठी फक्त १५ दिवसांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे.
नागरिकांना परतावा प्रकरणांच्या निपटाऱ्याची सद्यःस्थिती माहिती व्हावी, याकरिता दर महिन्याच्या १ व १२ तारखेला त्या दिवसापर्यंत कोणत्या दिनांकाची प्रकरणे निकाली काढली आहेत, त्याची माहिती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येते. तसेच महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. या कालावधीत पाच लाखांच्या आतील रकमेची परताव्याची दाखल होणारी प्रकरणे त्याच दिवशी निकाली काढण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली.
....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna : मोठी बातमी ! प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

भाड्याच्या घरात सापडलेला रवींद्र महाजनी यांचा मृतदेह; पत्नी- मुलासोबत का राहत नव्हते? हे होतं कारण

Georai News : मुंबईतील सीआयएसएफ मुख्यालयात जवानाने संपविले जीवन; धक्कादायक घटनेने गेवराईच्या तलवाड्यात शोककळा!

Astrological Prediction : उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातील नेत्याची निवड ते राज्य मंत्रिमंडळातील बदल; काय सांगत राजकीय भविष्य? वाचा...

Education News : शिक्षक नाहीत तर शाळा कशाला?"; आदिवासी पालकांचा संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT