पुणे

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया मादी कासवावर यशस्वी

CD

पुणे, ता. १ : अंडी बाहेर काढू न शकणाऱ्या मादी कासवावर नुकतीच देशातील पहिली लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाली. त्यातून चार विकसित अंडी बाहेर काढून १.५ किलो वजनाच्या कासवाला जीवदान मिळाले आहे.
तळेगावजवळील सोमाटणे येथील एका कुटुंबाकडील पाळीव कासवाची काही महिन्यांपासून हालचाल कमी झाली होती आणि आहारही बंद झाला होता. तपासणीत वाढलेले यकृत, हिमोग्लोबिनची कमतरता आणि क्रॉनिक एग-बाइंडिंग आढळून आले. या स्थितीत कासव नैसर्गिकरीत्या अंडी देऊ शकत नाहीत. इंजेक्शनद्वारे अंडी नैसर्गिकरीत्या बाहेर काढण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, ‘द स्मॉल ॲनिमल क्लिनिक’मध्ये पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान कासवाच्या गर्भाशयाजवळ छोट्या छिद्रातून फैलोपियन ट्यूबमध्ये प्रवेश करून चार अंडी आणि अंडाशय सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. आता हे कासव पूर्ववत झाले आहे. त्याचा आहारही सुरू झाला आहे. डॉ. रीना हरिभट, अंकिता, डॉ. अस्मी परदेशी आणि डॉ. अपर्णा फणसाळकर आदींनी शस्त्रक्रियेत भाग घेतला.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna : मोठी बातमी ! प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

भाड्याच्या घरात सापडलेला रवींद्र महाजनी यांचा मृतदेह; पत्नी- मुलासोबत का राहत नव्हते? हे होतं कारण

Georai News : मुंबईतील सीआयएसएफ मुख्यालयात जवानाने संपविले जीवन; धक्कादायक घटनेने गेवराईच्या तलवाड्यात शोककळा!

Astrological Prediction : उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातील नेत्याची निवड ते राज्य मंत्रिमंडळातील बदल; काय सांगत राजकीय भविष्य? वाचा...

Education News : शिक्षक नाहीत तर शाळा कशाला?"; आदिवासी पालकांचा संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT