पुणे

शास्त्रीय संगीताचे अभ्यासक मंगेश वाघमारे यांचे निधन

CD

पुणे, ता. ३ ः आकाशवाणीचे निवृत्त निवेदक आणि शास्त्रीय संगीताचे अभ्यासक मंगेश वाघमारे (वय ६५) यांचे शनिवारी (ता. २) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
आकाशवाणीवरील, तसेच सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांमधील वाघमारे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निवेदनाने श्रोत्यांना तीन दशकांहून अधिक काळ श्रवणानंद दिला. त्यांचे मूळ गाव अंबड (जि. जालना) हे होय. तेथील श्री दत्तजयंती संगीत महोत्सवात निवेदन करताना त्यांच्यातील निवेदक घडला. गायनाचार्य पं. गोविंदराव जळगावकर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी आपली निवेदन शैली घडवली. सुरवातीला काही वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकारिता केली. पुढे ते आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर रुजू झाले. तेथे ३३ वर्षे आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावर दोन वर्षे निवेदक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
‘महक’, ‘परिमल’, श्रुतिका, मुलाखती यातून वाघमारे यांनी रसाळ भाषेत सांगीतिक संकल्पना रसिकांसमोर उलगडल्या. शास्त्रीय, सुगम, चित्रपट संगीताबरोबरच कर्नाटक, पाश्चात्त्य आणि प्रादेशिक लोकसंगीताचा व्यासंग त्यांनी जपला. संगीतकार राम कदम, प्रभाकर जोग, अनिल मोहिले, प्यारेलालजी, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह अनेक कलाकारांच्या मैफलींमध्ये त्यांनी सूत्रसंचालन केले होते. वाघमारे यांच्या पार्थिवावर रविवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

PNE25V37061

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT