पुणे

भूमिगत मेट्रो ९ महिन्यांनी ट्रॅकवर?

CD

मंगेश कोळपकर : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या स्वारगेट-कात्रज या भूमिगत मेट्रोचे काम सहा महिन्यांनंतरही सुरू झालेले नाही. त्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी भूमिपूजन केल्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी या मार्गाचे काम सुरू होण्याची चिन्हे आहेत. या मार्गावर दोन भूमिगत स्थानके वाढल्यामुळे काम सुरू होण्यास उशीर झाल्याचे महामेट्रोचे म्हणणे आहे.

राज्यात गेल्यावर्षी २० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक झाली. तत्पूर्वी २९ सप्टेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण झाले तर, स्वारगेट- कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर किमान महिनाभरात या मार्गावर काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, ते सुरू झाले नाही. या मार्गासाठी महामेट्रोने बुधवारी (ता. ९) आंतरराष्ट्रीय निविदा मागविल्या आहेत. त्यासाठी ४० दिवसांची मुदत दिली आहे. निविदा आल्यावर त्यांची छाननी झाल्यावर जून-जुलैमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात होऊ शकते, असे महामेट्रोचे म्हणणे आहे.

दोन स्थानके वाढल्याने पुन्हा निविदा
महामेट्रोने स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रो मार्गासाठी डिसेंबर- जानेवारीमध्ये निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. पूर्वीच्या मूळ आराखड्यात मार्केटयार्ड, पद्मावती आणि कात्रज या स्थानकांचा समावेश होता. मार्केटयार्ड, बिबवेवाडी, बालाजीनगर, धनकवडी या परिसरातील रहिवाशांना त्यात कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे नागरिकांकडून ओरड होऊ लागली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दोन स्थानके वाढविण्याचा आदेश दिला. त्यानंतर मेट्रोने पहिली निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा तयार केली आणि ती बुधवारी प्रसिद्ध झाली. जर जून महिन्यात या मार्गाचे काम सुरू झाले तर ते पूर्ण होण्यासाठी जून २०२९ हे वर्ष उजाडणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यावर तीन महिन्यांत निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु, नागरिकांनी दोन स्थानकांची मागणी केली. तेथे दाट लोकवस्ती असल्यामुळे त्याची दखल घ्यावी लागली आणि दोन स्थानके या मार्गात वाढविली आहेत. जून-जुलैमध्ये भूमिगत मेट्रो मार्गाचे काम सुरू होऊ शकेल.
- हेमंत सोनवणे, संचालक, महामेट्रो

स्वारगेट-कात्रज मार्गावरील स्थानके
१- कात्रज (कात्रज बसस्थानकाजवळ)
२- बालाजीनगर (भारती विद्यापीठाजवळ)
३- पद्मावती (शंकर महाराज मठाजवळ)
४- बिबवेवाडी (अण्णाभाऊ साठे सभागृहाजवळ)
५- मार्केटयार्ड (सिटीप्राईड चित्रपटगृहाजवळ)

अशी आहे स्थिती....
५.४६ किमी
- स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग

३ हजार ६४७ कोटी रुपये
- एकूण खर्च

६८३ कोटी रुपये
- वाढलेल्या दोन स्थानकांचा खर्च (हा खर्च राज्य सरकार करणार)

४ वर्षे
- काम पूर्ण होण्याचा कालावधी

१ लाख ६० हजार
- पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी (दैनंदिन प्रवासी संख्या)

२६ ते २७ लाख रुपये
- दैनंदिन उत्पन्न

तब्बल २८ मीटर खाली
स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्ग आणि स्थानके करताना पुणे मेट्रो जमिनीखाली सुमारे १८ ते २८ मीटरवर काम करणार आहे. पद्मावती
ते कात्रज हा भाग उंचावर असल्यामुळे तेथे जमिनीखाली २८ मीटरवर मेट्रोमार्ग आणि स्थानकांचे काम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT