पुणे

घटसर्प-धनुर्वाताच्या लशींचा खडखडाट

CD

कात्रज, ता. १७ : पुणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये घटसर्प-धनुर्वाताच्या (टीडी) लसीचा तुटवडा आहे. शहरातील प्रत्येक केंद्रावर आठवडाभराने लस येईल, असे केंद्रप्रमुखांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मागील तीन महिन्यांपासून लसीचा तुटवडा असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, त्यांच्यावर दवाखान्यात फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे.
महापालिका कोणत्याही प्रकारची लस खरेदी करत नाही. महापालिकेला संपूर्ण लसीचा पुरवठा हा राज्य सरकारकडून होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या मुख्य लसीकरण कार्यालयाकडून राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यालयाकडे १६ जानेवारी २०२३ ला २० हजार लसींची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर दोन महिन्यांच्या काळात राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रत्यक्षात केवळ २४०० घटसर्प-धनुर्वाताच्या (टीडी) लसींचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
नारायण पेठेतील मुख्य लसीकरण वितरण केंद्रात सद्यःस्थितीत एकही लस उपलब्ध नाही. आरोग्य केंद्रावर घटसर्प-धनुर्वाताची लस मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून त्यांना खासगी दवाखान्यात जाऊन या लसीची खरेदी करावी लागते. महापालिकेचा हक्काचा दवाखाना असतानाही नागरिकांना अर्थिक भुर्दंड बसत आहे. त्याचबरोबर नाहक त्रासालाही सामोरे जावे लागते.

राज्य सरकारकडून आम्हाला मागणीप्रमाणे लशी मिळालेल्या नाहीत. या महिन्याच्या शेवटी मिळेल, असे सांगण्यात आले होते. परंतु, आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने कधी पुरवठा होईल, असे हे सांगता येत नाही, असे कुटुंब कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले.
- डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

आम्ही धनुर्वाताची लस घेण्यासाठी महापालिकेच्या दवाखान्यात गेलो होतो. मात्र लस उपलब्ध नव्हती. आठ दिवसांनंतर येईल, असे सांगण्यात आले. मात्र पंधरा दिवसांनंतर जाऊनही दवाखान्यात लस उपलब्ध नव्हती.
- मंजू लोंढे, नागरिक

महापालिकेच्या आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपासून घटसर्प-धनुर्वाताच्या लस मिळत नसल्याची बाब गंभीर आहे. यामुळे नागरिकांवर फेऱ्या मारण्याची वेळ तर येतेच; परंतु आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.
- मनीषा कोपनर, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT