Hapus Mango
Hapus Mango sakal
पुणे

Hapus Mango : हापूस खरेदी करताय, या गोष्टी तपासा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दरवर्षी आंबा हंगामात कोकणातील हापूससोबतच इतर राज्यांतील आंबा बाजारात दाखल होतो. तो कोकणातील ‘देवगड हापूस’ किंवा ‘कोकण हापूस’ नावाने विकल्याचा प्रकार होतो. त्यामुळे ग्राहकांनी हापूस खरेदी करताना तो कोकणातीलच हापूस आहे, याची खात्री करावी, असे आवाहन पुणे बाजार समितीने केले आहे.

ग्राहकांना कोकणातील दर्जेदार हापूस आंबा मिळावा आणि उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. परराज्यातील आंबा हा महाराष्ट्रात उत्पादित झालेला आहे किंवा ‘कोकण हापूस’ आहे, असे भासवून विक्री करणे बेकायदेशीर आहे.

- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

ग्राहकांकडून कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच त्याच्या किमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. गेल्यावर्षी पुणे बाजार समितीत कर्नाटक, केरळ येथून आलेला आंबा ‘देवगड हापूस’ या नावाने लेबल लावून विक्री करतानाचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे पणन संचालकांनी तपासणी करून कारवाईचा आदेश दिला होता.

असा ओळखा हापूस

  • नैसर्गिक सुगंध, चवीला चांगला असतो

  • आतून केशरी आणि साल पातळ

  • जास्त रसाळ, आकार थोडासा उभट

    इतर राज्यांतील आंब्यांच्या पॅकिंगमधील बदल करून तो रत्नागिरी, देवगड हापूस असल्याचे भासविणे बेकायदेशीर आहे. असे प्रकार आढळल्यास बाजार समिती तो आंबा जप्त करून दंडात्मक कारवाई करणार आहे. तसेच अडत्यांचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्यात येईल.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

देवगड, रत्नागिरी

- कोकणातून आवक

केरळ, गुजरात, कर्नाटक

- इतर राज्यांतून

५,००० ते ६,००० पेट्या

कोकणातून दररोज आवक

१,५०० ते ३,५०० रुपये

कच्चा आंबा (४ ते ७ डझन)

२,००० ते ४,५०० रुपये

कच्चा आंबा (५ ते १० डझन)

२,००० ते ४,००० रुपये

तयार आंबा (४ ते ७ डझन)

२,५०० ते ५,००० रुपये

तयार आंबा (५ ते १० डझन)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT