मार्केट यार्ड : देशाच्या पूर्व किनारपट्टीवरून गणेश पेठेतील बाजारात मासळी दाखल होत आहे. बाजारात येत असलेल्या मासळीच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने भावात पाच ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी पडल्याने इंग्लिश अंडीच्या दरात शेकड्यामागे २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर, चिकन, मटण व गावरान अंडीचे भाव टिकून आहेत.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २९) खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो आणि नदीच्या मासळीची ३ ते ४ टन इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे २० ते २५ टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) - पापलेट : कापरी : १६००-२०००, मोठे : १४००-१६००, मध्यम : १०००-१२००, लहान : ८००-१०००, भिला : ८००-९००, हलवा : ८००-९००, सुरमई : ७००-१२००, रावस : १०००-१२००, घोळ : ८००-१०००, करली : ४००-५००, पाला : १२००-१४००, वाम : ८००-१०००, ओले बोंबील : ३५०-४५०. कोळंबी : लहान : २५०-३२०, मोठी : ४००-६००, जम्बो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : ३५०-४५०, मांदेली : १५०-२००, राणीमासा : ३००-३५०, खेकडे : ४००-४५०, चिंबोऱ्या : ६००-७००.
खाडीची मासळी : सौंदाळे : ४००-४५०, खापी : ४००-४५०, नगली : २५०-३००, तांबोशी : ५००-६००, पालू : ३००-३५०, लेपा : २००-२५०, बांगडा : २००-३५०, शेवटे : ३००-३५०, खुबे : १२०-१५०.
नदीतील मासळी : रहू : स्थानिक : २५०-३००, आंध्र : १५०-१८०, कतला : स्थानिक : २५०-३००, आंध्र : १५०-१८०, मरळ : ४००-४५०, शिवडा : २५०-३००, खवली : २५०-३००, आम्ळी : १२०-१८०, खेकडे : २५०-५००, चिलापी : ६०-१६०, वाम : ६००-६५०.
मटण : बोकड : ७८०, बोलाई : ७८०, खिमा : ७८०, कलेजी : ८२०. चिकन : २००, लेगपीस : २५०, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : ३००. अंडी : गावरान (शेकडा) १०२०, डझन : १३०, प्रतिनग : ११. इंग्लिश (शेकडा) : ६२१, डझन : ८४, प्रतिनग : ७.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.