पुणे - ट्रेकिंग करताना अपघात झाल्यानंतर पर्यटकाला बाहेर काढून स्ट्रेचरवरून नेताना एमएमआरसीसीचे गिर्यारोहक.
पुणे - ट्रेकिंग करताना अपघात झाल्यानंतर पर्यटकाला बाहेर काढून स्ट्रेचरवरून नेताना एमएमआरसीसीचे गिर्यारोहक. 
पुणे

पर्यटकांना जीवदान देणाऱ्यांचे नेटवर्क

ब्रिजमोहन पाटील

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मिळतेय मदत; ५०० गिर्यारोहकांचे जाळे
पुणे - सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ट्रेकिंग करण्यासाठी साहस लागतेच, पण शेकडो फूट खोल दऱ्यांमध्ये अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढणे हे त्याहून कौशल्याचे काम आहे. ट्रेकिंगला गेल्यानंतर निष्काळजीपणा, हुल्लडबाजी व अपुऱ्या माहितीमुळे अपघात होऊन पर्यटक दरीत कोसळतात, जंगलात रस्ता चुकतात. अशांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे जीव वाचविण्यासाठी राज्यात ३० गिर्यारोहक संस्था आणि ५०० गिर्यारोहक निःस्वार्थपणे सेवा करत आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षात १ हजार जणांना जीवनदान दिले आहे. 

‘महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्‍यू कॉर्डिनेशन सेंटर’ (एमएमआरसीसी) या नावाने पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, कोकण या भागांतील गिर्यारोहण करणाऱ्या संस्था, किल्ल्यांच्या परिसरातील ग्रामस्थ यांना एकत्र करून संघटन उभे केले आहे. जंगलात, किल्ल्यांवर फिरायला गेल्यानंतर त्या भागाची व्यवस्थित माहिती नसतानाही नको ते धाडस केल्याने अनेक अपघात घडतात. काही वेळा दरीमध्ये पर्यटक अडकतात. वेळीच मदत न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात. 

अपघात झाल्यानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये मदत मिळावी यासाठी ‘एमएमआरसीसी’ ही संस्था स्थापन केली. इगतपुरी, महाबळेश्‍वर, अंबोली घाट अशा कोणत्याही ठिकाणी अपघात घडल्यास संस्थेच्या माध्यमातून मदत पोचविण्यात येते.

पूर्वी महाबळेश्‍वर, अंबोली, लोणावळा यांसह इतर भागांत दुर्घटना घडली की पुण्यातील गिर्यारोहक बचावासाठी जात. यात खूप वेळ वाया जात होता. ही गैरसोय टाळण्यासाठी ‘एमएमआरसीसी’ संघटना स्थापन केली. मदतीसाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला. त्यावर फोन आला की जवळच्या गिर्यारोहकांना कळविले जाते. ते कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता स्वतःचा जीव धोक्‍यात घालून दोरखंडाच्या साह्याने दरीत उतरून पर्यटकांना बाहेर काढतात. गेल्या पाच वर्षांत सुमारे १ हजार जखमींना तर १५० मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत.
- उमेश झिरपे, संचालक, ‘एमएमआरसीसी’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT