trains departing from Pune cancelled from today to Monday block routes of some trains changed sakal
पुणे

पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे रद्द; आजपासून सोमवारपर्यंत ब्लॉक, काही गाड्यांचे मार्ग बदलले

दौंड ते मनमाड सेक्शन दरम्यान असलेल्या राहुरी-पढेगाव स्थानकांदरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. त्यामुळे २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दौंड ते मनमाड सेक्शन दरम्यान असलेल्या राहुरी-पढेगाव स्थानकांदरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. त्यामुळे २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळित होणार आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.

शनिवारी (ता. २१) या गाड्या रद्द ः दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, निजामाबाद-दौंड, पुणे-हजूरसाहिब नांदेड एक्स्प्रेस, हजूरसाहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेस. रविवारी (ता. २२) ः पुणे-हरंगुल एक्स्प्रेस, हरंगुल-पुणे एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद, जबलपूर-पुणे विशेष. सोमवारी (ता. २३) : पुणे-हरंगुल एक्स्प्रेस, हरंगुल-पुणे एक्स्प्रेस, पुणे-जबलपूर विशेष.

या गाड्यांचे मार्ग बदलले

जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस : मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळामार्गे धावेल. पुणे-हजूरसाहिब नांदेड एक्स्प्रेस : दौंड-कुर्डुवाडी-लातूर-परळी वैजनाथ-परभणीमार्गे धावेल. हजूरसाहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेस : परभणी-परळी वैजनाथ-लातूर-कुर्डुवाडी-दौंडमार्गे धावेल.

वास्को दा गामा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस : पुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी आणि मनमाडमार्गे धावेल. यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस : दौंड-पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड आणि सुरतमार्गे धावेल.

हजरत निजामुद्दीन-हुबळी एक्स्प्रेस : मनमाड - इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा- पुणे-दौंडमार्गे धावेल. हजरत निजामुद्दीन - वास्को द गामा गोवा एक्स्प्रेस : मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा-पुणेमार्गे धावेल. निजामाबाद-दौंड : परभणी-परळी वैजनाथ-लातूर-कुर्डुवाडी-दौंडमार्गे धावेल. दौंड-निजामाबाद : दौंड-कुर्डुवाडी-लातूर-परळी वैजनाथ-परभणी मार्गे धावेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका मुख्यालय आणि सीएसटीएम समोरील वाहने हटवण्यास सुरुवात

Sinhagad Road Flyover : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे उद्घाटन, नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण

पोलिस आयुक्तांनी काढला ‘डीजे’वरील निर्बंधाचे आदेश! गणपती विसर्जन मिरवणूक व ईद ए-मिलादच्या मिरवणुकीत नाही 'डीजे'ला परवानगी; आदेश मोडल्यास होणार ‘ही’ शिक्षा

Nilesh Rane on Manoj Jarange : जरांगेंनी भावाला चिचुंद्री म्हटलं, आमदार निलेश राणे भडकले; म्हणाले, राणे कुटुंबावर...

Shahu Maharaj : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शाहू महाराजांची एन्ट्री; म्हणाले, 'सरकारने जबाबदारी टाळली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'

SCROLL FOR NEXT