pune.jpg
pune.jpg 
पुणे

Wari 2019 : तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा

देहू : "पंढरीच्या लागा वाटे। सखा भेटे विठ्ठल।।... या भावनेने आषाढी वारी निमित्त संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो भाविक सोमवारी देहूत सहभागी झाले. पंढरीच्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी वैष्णवांचा मेळा देहूतील इंद्रायणी नदी काठी जमला. निमित्त होते आषाढीवारीचे. विठुरायाला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने देहूतून पंढरपूरकडे अडीच वाजण्याच्या सुमारास प्रस्थान ठेवले.

हातात भगव्या पताका घेवून आषाढी वारीसाठी जमलेल्या वारकऱ्यांनी केलेल्या टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम नामघोषात देहूनगरी दुमदुमली. भक्ती रसात न्हाऊन निघालेल्या वैष्णवांनी आनंदाने दिंड्यासमोर फेर धरला. वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाडा परिसरात पालखी प्रस्थान सोहळा याची देही,याची डोळा अनुभवला.

पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी देऊळवाड्यात गर्दी केली होती.तर दुसरीकडे इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलुन गेला होता. परंपरेनुसार पालखी प्रस्थान सोहळ्याचे पारंपारिक कार्यक्रम पहाटे साडेचारपासून सुरु झाले. पहाटे पाच वाजता देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे,अजित महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे, अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्याहस्ते महापुजा झाली.विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे यांच्याहस्ते पुजा झाली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधि मंदिरातील महापूजा संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे यांच्याहस्ते झाली. देऊळवाड्यातील भजनी मंडपात सकाळी दहा वाजता रामदास नाना महाराज मोरे यांचे पालखी सोहळ्याचे काल्याचे किर्तन झाले. 
''पाहती गवळण। तवती पालथी दुधानी।। या अभंगावर निरुपण केले. 

सकाळी साडेदहा वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतील घोडेकर बंधू(सराफ) यांनी चकाकी देवून इनामदारवाड्यात आणल्या.दिलीप महाराज गोसावी इनामदार यांनी सपत्निक संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पुजा केली. मानकरी म्हसलेकर दिंडी यांनी डोक्‍यावर पादुका घेवून, संबळ, टाळमृदंग आणि तुताऱ्या वाद्यांसह वाजतगाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. \दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली. देऊऴवाड्यातील भजनी मंडपात संत तुकाराम महाराज पादूका आणि माऊलींच्या पादुकांची कामगारमंत्री बाळा भेगडे यांनी सपत्निक महापूजा केली. तसेच खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवडचे महापौर राहूल जाधव, रोहीत पवार यांच्या हस्ते महापुजा झाली. पुण्यातील नवी पेठेतील आणि आषाढी वारीतील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील ज्येष्ठ वारकरी सदाशिव भोरेकर यांनाही पुजेचा मान मिळाला. देहूतील पुजारी नारायण अत्रे यांनी पौराहित्य केले. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, अजित महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माजी विश्वस्त बाळासाहेब मोरे, सुनिल मोरे, पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, प्रांत सचिन बारवकर, तहसिलदार गिता गायकवाड, सरपंच पूनम काळोखे व इतर उपस्थित होते

पुजा सुरु झाल्यानंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश देण्यात आला. मोहिते पाटील व बाभुळगावकर यांच्या अश्वांनी महाद्वारातून प्रवेश केला. पादुका पुजनानंतर फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख यांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. देहुवाड्यात मंदिर प्रदक्षिणेसाठी फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. देऊळवाड्यातील मंदिर प्रदक्षिणा सुरु झाली. वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकारामांचा नामघोष आणि विठुनामाचा गजर करीत वारकरी फुगड्या घरू लागले. देहभान विसरून वारकरी आनंदाने नाचत होते. प्रदक्षिणेसाठी मानाच्या दिंड्या सज्ज होत्या. मानाचे अश्व होते. खांद्यावर गरुडटक्के आणि हातात चोप घेतलेले चोपदार होते. देऊळवाड्यातील प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी स्थळी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची भेट घडविण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पालखी सोहळा इनामदारवाड्यात मुक्कामी पोचला. मंगळवारी(ता.25) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पालखी सोहऴा आकुर्डीकडे मार्गस्थ होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT