पुणे

बोगद्याजवळ लोखंडी बॅरिकेड्‌स

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - खंडाळा घाटातील लोहमार्गावर बोगद्याच्या अलीकडे दरडी कोसळत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी रेल्वेने लोखंडी बॅरिकेड्‌स लावण्याचे काम हाती घेतले आहे. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लोहमार्गावर काही ठिकाणी हे बॅरिकेड्‌स बसविले आहेत. या उपायांमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरक्षितपणे होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

आतापर्यंत खंडाळा घाटाच्या परिसरात तीन वेळा दरड कोसळली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर लोखंडी बॅरिकेड्‌स लावलेल्या ठिकाणी डोंगरमाथ्याचा परिसर आहे. अतिपावसामुळे दगड घसरून खाली आल्यास ते लोखंडी बॅरिकेड्‌समध्ये अडकणार आहेत, त्यामुळे रेल्वेगाडी आणि लोहमार्गाला धोका पोचण्याची शक्‍यता नाही. पुणे ते मुंबई लोहमार्गावर घाट परिसरात तीन लाइन टाकल्या आहेत. दोन लाइन या पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तर एक लाइन मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. घाट परिसरात काही कारणामुळे एखादी लाइन ठप्प झाली तर अन्य रेल्वे वाहतूक खोळंबून राहू नये, म्हणून ही व्यवस्था केली आहे. 

दरम्यान, ठाण्याहून पनवेलकडे जाणारा लोहमार्ग डोंगरालगत परिसरातून जातो. या ठिकाणी दरडीचा धोका आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने या परिसरात लोखंडी जाळ्या लावून हा भाग सुरक्षित केला आहे. त्याचप्रमाणे आता खंडाळा घाट परिसरातही अशा प्रकारची मोहीम राबवण्यात येणार आहे. 

सर्वेक्षणाचे काम सुरू 
खंडाळा घाटाच्या परिसरात दरड कोसळतील असा धोकादायक भाग कुठे आहे, याचा शोध घेण्याचे काम रेल्वेने सुरू केले आहे. घाट परिसरातील लोहमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करायच्या याचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले. 

खंडाळा घाट परिसरातील लोहमार्गाची काळजी घेण्याचे काम रेल्वे प्रशासन सातत्याने करत असते. घाट परिसरात उपाययोजना करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. 
- अनिल जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT