पुणे

pune wall collapse :  कोंढवा दुर्घटनेतील बारा आरोपी अद्याप मोकाटच 

सकाळ वृत्तसेवा

पुणे/गोकूळनगर -  कोंढव्यातील अल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेमधील आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊनही उर्वरित बारा आरोपींना कोंढवा पोलिसांनी अद्याप अटक  केलेली नाही. 

या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच, या प्रकरणामध्ये कोंढवा पोलिसांनी अल्कॉन प्रमोटर्स ॲण्ड बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या कंपनीचे अध्यक्ष, संचालक, कांचन डेव्हलपर्स कंपनीचे तीन भागीदार आणि दोन्ही बांधकाम कंपन्यांमधील अन्य विभागांशी संबंधित व्यक्‍तींवर सदोष मनुष्यवध व गुन्ह्यात सहभाग, असे गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी अल्कॉनच्या विवेक सुनील अग्रवाल व विपुल सुनील अग्रवाल या दोघांना कोंढवा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. तर, जगदीशप्रसाद तिलकचंद अग्रवाल, सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल, राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल, कांचन डेव्हलपर्सचे भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्‍मिकांत गांधी यांच्यासह त्यांचे प्रकल्प अभियंता, प्रकल्प पर्यवेक्षक, कामगार कंत्राटदार व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी उर्वरित बारा आरोपींना पोलिसांनी अटक करण्याची अपेक्षा होती. मात्र, पोलिसांनी अजूनही आरोपींना अटक केली नाही. 

दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी विवेक अगरवाल व विपुल अगरवाल या दोन बांधकाम व्यावसायिकांना आम्ही अटक केली आहे. उर्वरित आरोपींची नावे, त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निश्‍चित करून त्यांना अटक करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल. 
- अनिल पाटील, पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे

अटकेतील बिल्डरांना पोलिस कोठडी
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले बांधकाम व्यावसायिक विवेक सुनील अग्रवाल आणि विपुल सुनील अग्रवाल या दोघांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. २) पोलिस कोठडी  सुनावली आहे. 

या दोघांना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. अल्कॉन स्टायलस सोसायटीमध्ये अनेक समस्या आहेत. त्यात सीमाभिंत निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकांना केली होती. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. 

या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी सोसायटीचे बांधकाम नकाशे मिळवणे, बांधकामाच्या कायदेशीर बाबी तपासणे, सीमाभिंती बांधकाम केलेल्या ठेकेदार याबद्दल दोन्ही आरोपींकडे चौकशी करण्यात आली. परंतु त्यांनी ही माहिती दिलेली नाही. याचा तपास करण्यासाठी व इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील व्ही. आर. बकाल यांनी केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदिन यांनी ही मागणी ग्राह्य धरत, दोन दिवसांची कोठडी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT