Twenty crores profit for G S metropolitan bank Annual General Meeting
Twenty crores profit for G S metropolitan bank Annual General Meeting 
पुणे

जी. एस. महानगर बँकेला 20 कोटींचा नफा; वार्षिक सर्वसाधारण सभा 

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : रिझर्व्ह बँकेने अमलात आणलेल्या अत्याधुनिक आर. टी. जी. एस सुविधेसह ई काॅर्मसच्या माध्यमातून ग्राहकांना डेबिट कार्डद्वारे वस्तु खरेदी, दूरध्वनी बील, रेल्वे रिझव्हेर्शन यासंह अन्य आधुनिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. 

या आर्थिक वर्षात बँकेला 20 कोटी 33 रूपये नफा झाला आहे. अशी माहिती जी. एस. महानगर बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांनी दिली. जी. एस. महानगर बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथील यशवंत नाट्य मंदिर मध्ये पार पडली. त्यावेळी शेळके बोलत होते.

यावेळी उपाध्यक्ष अप्पासाहेब लामखडे, संचालिका सुमन शेळके, भास्कर खोसे, बन्सी बांगर, सुरेश ढोमे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुनाथ कांचन यासंह अन्य संचालक उपस्थित होते.

शेळके म्हणाले, भागधारकांना 12 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. बँकेकडे दोन हजार 471 कोटी रूपयांच्या ठेवी असुन एक हजार 533 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.खेळते भांडवल तीन हजार 4 कोटी 48 लाख रूपयांचे आहे. 65 कोटी 73 लाख रूपयांची गुंतवणूक आहे. बँकेच्या 67 शाखा असून बँकीग क्षेत्रात रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या निकषानुसार सहकारी बँकीग क्षेत्रात देशात बँकेचा 14 वा नंबर असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होण्यात सर्वांचे सहकार्य...
स्व. गुलाबराव शेळके यांनी लावलेल्या महानगर बँकेच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर होण्यात संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद व ठेवीदारांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्व. शेळके यांचा बँकेला मोठा वारसा आहे हाच वारसा डोळ्यासमोर ठेवुन आम्ही वाटचाल करू, अशी ग्वाही शेळके यांनी सभासदांना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT