1fraud_23.jpg
1fraud_23.jpg 
पुणे

 कंत्राटदाराकडून 80 हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून 80 हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्यांचा प्रकार उघडकीस आला आहे. खासगी रुग्णालयात पाईपलाईन व आगविरोधी यंत्रणा बसविणाऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली

बाबु वसंत ननावरे (वय 30), गौतम अप्पा जगदाळे (वय 24, रा.ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी पुणे स्टेशन येथील 48 वर्षीय नागरिकांने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुंबईतील पाईपलाईन व आगविरोधी यंत्रणा (प्लंबिंग ऍन्ड फायर फायटिंक सिस्टीम) खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. बंडगार्डन रस्त्यावरील नामांकीत रुग्णालयाच्या नव्याने होणाऱ्या कर्करोग केंद्रामध्ये पाईपलाईन व आगविरोधी यंत्रणा बसविण्याचे त्यांच्या कंपनीस कंत्राट मिळाले होते. त्यानुसार फिर्यादी व त्यांचे काम संबंधीत ठिकाणी काही दिवसांपासून काम करीत आहेत.
12 मार्चला त्यांच्या कामाच्या ठिकाणी बाबु ननावरे व गौतम जगदाळे हे दोघेजण आले. आपण माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगून फिर्यादी यांचे काम बंद पाडले. माथाडी कामगार असल्यामुळे त्यांनी त्यांच्या परवानगीशिवाय फिर्यादी यांना काम करण्यास मज्जाव केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या मालकाडून रोख रक्कम व धनादेश अशा स्वरुपात 80 हजार रुपयांची खंडणी जबरदस्तीने घेतली. त्यानंतर दोघेही फिर्यादींना सातत्याने खंडणीची मागणी करू लागले. नऊ जुनला त्यांनी फिर्यादींना पुन्हा 25 हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून फिर्यादी व त्यांच्या मालकाने खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे याबाबत तक्रार दिली.

त्यानुसार, पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT