Two arrested in gold loan office robbery case of Chandannagar
Two arrested in gold loan office robbery case of Chandannagar 
पुणे

पुणे : चंदननगरच्या गोल्ड लोन कार्यालय दरोडा प्रकरणी दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या चंदननगर येथील 'आयआयएफएल'च्या कार्यालयातील पिस्तुलाचा धाक दाखवून भरदिवसा घातलेल्या दरोडा प्रकरणातील दोन आरोपींना चंदननगर पोलिसांनी बुलढाणा येथून अटक केली. 4.2 कोटी रुपयांचे 12 किलो वजनाचे सोने चोरुन नेणाऱ्या आरोपींकडून पोलिसांनी 8 किलो 300 ग्रॅम वजनाचे सोने व कार असा तीन कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला. 

‘ड्रंक अँड ड्राइव्ह’अंतर्गत १३ हजार वाहनचालकांवर कारवाई

दिपक विलास जाधव (वय 32, रा.वाघोली), सनी केवल कुमार (वय 29, रा.लोणार गल्ली) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी मनिषा मोहन नायर (वय 29, रा.येरवडा) यांनी फिर्याद दिली होती. गुरुवारी सकाळच्या सुमारास चंदननगर येथील "आयआयएफएल' या कंपनीच्या कार्यालयात तिघांनी घुसून पिस्तुलाचा धाख दाखवून ग्राहकांनी तारण ठेवलेले सोने लॉकरमधून काढून चोरुन पलायन केले होते. 

हे काय! पैशांअभावी बसथांब्यावरच झाली प्रसूती

या घटनेनंतर चंदननगर पोसिलांनी वेगवेगळी पथके तयार करुन तपासाला सुरूवात केली.तपासामध्ये एका सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये पोलिसांना नंबरप्लेटला माती लावलेली एक कार निदर्शनास आली. पोलिसांनी त्या कारचा माग काढल्यानंतर ती कार बुलढाणा येथील एका घरासमोर थांबल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधीत घरातून दिपक जाधव यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्यानेच अन्य दोन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर सनी कुमार या त्यांच्या दुसऱ्या साथीदारालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 8 किलो 300 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक स्विफ्ट कार असा 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, सोमनाथ टपरे, कर्मचारी मोहन वाळके, अजित धुमाळ, श्रीकांत गांगुर्डे, राजेंद्र दिक्षीत, पंडीत गावडे, रवि रोकडे, प्रदिप सोनवणे, तुषार खराडे, चेतन गायकवाड, तुषार आल्हाट आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. 

मेट्रो पिलरसाठी जिओ टॅगिंग लवकरच
दिपक जाधव हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अभ्यास करतो. तर सनी कुमार हा रोजंदारीवर काम करतो. या दोघांची बुलढाण्यातच ओळख झाली. त्यानंतर त्या तिघांची एकमेकांशी ओळख झाली. दरम्यान, पैशांसाठी त्यांनी दरोडा टाकण्याचे ठरवून हा गुन्हा केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT