Home-Theft
Home-Theft 
पुणे

पुण्यात घरफोडीच्या दोन घटना, दोन ठिकाणी चोरीचे प्रयत्न फसले

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन घरफोडीचे प्रकार घडले आहेत. तर दोन ठिकाणी हात साफ करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात दोन तर हडपसर आणि कोथरूड पोलिसांत प्रत्येक एक गुन्हा दाखल आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवणे येथे राहणारे संतोष बबन पासलकर (वय 39) यांचा वारजे चौक परिसरात फ्रॅब्रिकेशनचा कारखाना आहे. सोमवारी (ता.28) रात्री कारखाना बंद केल्यानंतर चोरटे कडी-कोयंडा तोडून आत घुसले. कंपनीतील ग्रॅन्ड मशिन व वायर असा 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार समोर आला. राजू परशुराम वीर (वय 35) यांचा देखील वारजे चौकाजवळ वेल्डिंग वर्क शॉप आहे. या वर्कशॉपचा पत्रा कापून चोरटे आत घुसले व ड्रॉवरमध्ये ठेवलेली 40 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. या दोन्ही चोरींविषयी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांजरी फार्म पोस्ट ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चोरट्यांना तिजोरी उघडता न आल्यामुळे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. याप्रकरणी राहुल विठ्ठल जाधव (वय 33) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूडमधील लौकित सोसायटीमध्ये राहणाऱ्या गीता चॅटर्जी यांचा बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सोसायटीचे चेअरमन मनोजकुमार बाबूलाल शहा (वय 57) यांनी तक्रार दिली आहे. चॅटर्जी या कोरोनामुळे मुलीकडे गेल्या आहेत. त्यांच्या फ्लॅटमधून कोणतीही वस्तू किंवा रक्कम चोरीला गेली नाही. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT