Crime_Kidnapping 
पुणे

गाडीच्या व्यवहारात फसवलं म्हणून बाप-लेकानं एजंटला केलं किडनॅप!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाहन विक्रीच्या व्यवहारामध्ये मध्यस्थी करून फसवणूक केल्यामुळे बाप-लेकाने मध्यस्थी करणाऱ्या वाहन विक्री एजंटचे गुरुवारी (ता.५) अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. एजंटकडे पैशांची मागणी करीत त्यांनी एजंटला सोडून दिले. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

रविकांत मोरे (वय 45) असे अपहरण केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बसप्पा कुंभार आणि श्रीकांत बसप्पा कुंभार (दोघेही रा. जत, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविकांत मोरे हा वाहन विक्री एजंट आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका वाहनाची बसप्पा कुंभार यांना विक्री केली होती. त्यांच्याकडून पैसेही घेतले. संबंधित वाहन मोरे यांनी तोडकर नावाच्या एका व्यक्तीकडून घेऊन ते परस्पर साळुंके नावाच्या व्यक्तीला विकले. त्यामुळे साळुंकेने कुंभार यांना विकलेले वाहन पोलिसांच्या मदतीने सोडवून नेले.

या सगळ्या गोंधळात कुंभारची मोरे याने आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे कुंभार बाप-लेकाने मोरे याला गुरुवारी मार्केट यार्ड परिसरातून त्यांच्या गाडीत उचलून नेले. त्याचबरोबर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी मोरेची सुटका केली. त्यानंर मोरे याने थेट पोलिस ठाणे गाठून दोघांविरुद्ध फिर्याद दिली. मार्केट यार्ड पोलिस आरोपींच्या मागावर आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Ghat: कात्रज घाटात संरक्षक भिंती ढासळल्या; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

जेवणापासून भेटवस्तूंपर्यंत... प्राजक्ता गायकवाडच्या माहेरच्यांनी असं केलं जावयाचं धोंडेजेवण, म्हणते- कटाच्या आमटीनेच...

Yavatmal News : मंत्री संजय राठोड यांची राजकीय रणनीती यशस्वी; दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध

Latest Marathi News Live Update: महिला पोलिस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pandharpur News : वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध; विश्वासात न घेता उमेदवारी, आमदार अभिजीत पाटील यांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT