Chandani Chowk
Chandani Chowk Sakal
पुणे

Chandani Chowk Bridge : चांदणी चौकातील कामाला आणखी दोन महिने

प्रशांत पाटील

चांदणी चौकात एनडीए व बावधनला जोडण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी आवश्यक असलेले गर्डर तयार झाले आहेत.

पुणे - चांदणी चौकात एनडीए व बावधनला जोडण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी आवश्यक असलेले गर्डर तयार झाले आहेत. येत्या काही दिवसांत ते बसविण्याचे कामदेखील सुरू होईल. ९ गर्डरच्या माध्यमातून १५० मीटर लांबीचा व ३२ मीटर रुंदीचा पूल तयार होणार आहे. या पुलाला जोडणाऱ्या रॅम्प ३ व रॅम्प ७ चे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूल बांधून तयार झाल्यावर केले जाईल. मात्र त्याला आणखी किमान दोन महिने लागणार असल्याने मेमधील पुलाच्या उद्‍घाटनाचा मुहूर्त टळणार आहे.

चांदणी चौकात सुमारे ३९७ कोटी रुपयांचा खर्च करून १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दोन ठिकाणी अंडरपास व ८ नवीन रॅम्पदेखील तयार करण्यात आले आहेत. कोंडीला अडथळा ठरणारा पूर्वीचा पूल पाडण्यात आला. नव्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. नवा पूल पूर्वीच्या तुलनेत मोठा आहे. त्यामुळे वाहनांची संख्या वाढली तरीही कोंडी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

असा आहे नवीन पूल

बावधन-एनडीएला जोडणारा हा पूल १५० मीटर लांबीचा व ३२ मीटर रुंदीचा आहे. पूर्वीचा पूल हा ५० मीटर लांबीचा व २० मीटर रुंदीचा होता. पूर्वीच्या तुलनेत पुलाच्या लांबी व रुंदीत वाढ झाली आहे. तसेच जुन्या पुलाचा खांब रस्त्याच्या मधोमध येत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत होता. वाहनांसाठी जागा कमी पडायची. नव्या पुलामध्ये तसे नाही.

अल्ट्रा हायस्ट्रेंथ काँक्रिटचा वापर

पूल बांधताना पहिल्यादांच या पद्धतीचा वापर केला आहे. यात लोखंडाचा वापर केला जात नाही. स्टीलचा चुरा, विशिष्ट प्रकारचा दबाव निर्माण करून तयार करण्यात आलेले काँक्रिट व काही प्रमाणात फायबरचादेखील वापर केला आहे. त्यामुळे पुलाला अधिक मजबुती प्राप्त होते. पुलाच्या सुरवातीला व शेवटी खांबांचा वापर केला आहे. पुलाच्यामध्ये खांब नाही.

बावधन-वारजे जोडणारा रॅम्प सुरू

मुळशी व बावधनहून वारजे, साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यासाठी रॅम्प क्रमांक ६ तयार करण्यात आला. याचे काम पूर्ण झाल्याने या रॅम्पवरून वाहतूक सुरू झाली आहे. बहुतांश रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

नवीन पुलाचे काम वेगाने सुरू आहे. एनडीए चौकाच्या बाजूच्या भागात खांब उभा करण्याचे काम सुरू आहे. दोन महिन्यांत पूल बांधून तयार होईल.

- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT