uddhav thakare
uddhav thakare 
पुणे

शिवनेरीवर उद्धव ठाकरे म्हणाले, अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवू 

सकाळ वृत्तसेवा


जुन्नर/ओझर (पुणे) : ""छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते त्याप्रमाणे मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने सर्वसामान्यांना अभिप्रेत असणारे राज्य करणार आहे. सर्वांना अभिमान वाटेल, असा महाराष्ट्र घडवूया,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरीवर बोलताना सांगितले. 

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर गुरुवारी (ता. 12) दुपारी उद्धव ठाकरे हे कुटुंबीयांसमवेत शिवजन्मस्थानी आले होते. शिवजन्मस्थळी त्यांनी दर्शन घेतले. शिवकुंज येथील बाल शिवराय व जिजाऊ माता यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. आमदार अतुल बेनके, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्‍याम पांडे, माउली खंडागळे, राजेंद्र कुंजीर आदी या वेळी उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले, ""अनपेक्षितपणे माझ्यावर राज्यकारभाराची आलेली जबाबदारी ही जिजाऊ मॉंसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच येथील मातीला वंदन करण्यासाठी मी आलो आहे.'' 
या वेळी आमदार अतुल बेनके यांनी, जुन्नर तालुक्‍याचे नाव शिवनेरी तालुका करावे, अशी मागणी केली. 

नागरिकांच्या पदरी निराशा 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याविषयी नागरिकांना मोठी उत्सुकता होती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची व सातबारा कोरा करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवनेरीवर करतील, गडकोटविषयी बोलतील, शिवनेरीसाठी निधीची घोषणा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांनी कोणतीच घोषणा केली नाही. त्यामुळे पदरी निराशा पडल्याची चर्चा होत होती. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT