पुणे

'यूजीसी'च्या ऑनलाईन अभ्यासक्रमाकडे दूर्लक्ष; चार वर्षापुर्वी दिले होते निर्देश

ब्रिजमोहन पाटील

पुणे - विद्यापीठ, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी 'स्वयं'च्या माध्यमातून आॅनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून कौशल्य आत्मसात करणे आवश्यक होते, त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) चार वर्षापूर्वीच निर्देश दिले होते. मात्र, बहुतांश संस्थांनी व विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आॅनलाईन शिक्षणाचा प्रवास खडतर झाला आहे. 

'कोरोना'मुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था ठप्प झाली आहे, परीक्षा रद्द झाल्या, शाळा, महाविद्यालयांना टाळे लागलेले आहे. शैक्षणिक संकुल कधी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुन्हा कधी गजबजतील याबाबत शाश्वती नाही. अशा काळात आॅनलाईन शिक्षणाचा मार्ग निवडला जात आहे. विद्यार्थ्यांचे 'झूम'द्वारे क्लास, पीपीटी, पीडीएफ द्वारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, प्राध्यापकांनी व्हिडिओ तयार केले करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे यासाठी खटाटोप सुरू करण्यात आला आहे. मात्र, यातून लगेच सक्षम व्यवस्था उभी राहिल अशी शक्यता नाही.

उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या वापराने बदल आवश्यक असल्याने 'यूजीसी'ने २०१६ मध्ये परिपत्रक काढून 'स्वयं' हा    या आॅनलाईनवर पोर्टल उपलब्ध केले. त्यात परिणामकारक 'डिजीटल शिक्षणा'साठी किमान २० टक्के क्रेडीट ट्रान्सफर हे 'इ कंटेंट'च्या माध्यमातून व्हावे यासाठी 'स्वयं' वरून आॅनलाईन शिक्षणाचे धडे घ्यावेत, पदवीसाठी आवश्यक असलेले २ हजार पेक्षा जास्त पुरक कार्स उपलब्ध केले. मात्र, याकडे महाविद्यालयांनी दूर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांनी 'क्रेडीट टान्सफर'साठी आॅनलाईन शिक्षण घेतले नाही. मोजके व्यवसायिक अभ्यासक्रम सोडले तर इतर अभ्यासक्रमांनी याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे येत्या काळात 'स्वयं'वरील आॅनलाईन अभ्यासक्रमात सहभाग वाढवणे आवश्यक होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे विद्यापीठाने उचलेले पाऊल
आॅनलाईन शिक्षणाची गरज अधोरेखीत झाल्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यादृष्टीने पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. पुणे विद्यापीठाने 'स्वयं', 'इ-पाठशाळा' यांच्या धर्तीवर किमान  ४० टक्के अभ्यासक्रम आॅनलाईन करण्यासाठी काम सुरू झाले   आहे. त्यासाठी प्राध्यापकांना विद्यापीठातील 'इएमआरसी', 'इ कंटेंट डेव्हलपमेंट स्टुडिओ' चा वापर करता येणार आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"आॅनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात 'यूजीसी'ने २०१६ मध्ये निर्देश दिले होते. त्यानुसार पुणे विद्यापीठातील काही विभागांनी 'स्वयं'वरून २० टक्के 'क्रेडिट टान्सफर'साठी कोर्स घेतले आहेत. महाविद्यालय स्तरावर यादृष्टीने काम सुरू अाहे."
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT