bhigwan
bhigwan 
पुणे

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस जोडणी करावी - सोनटक्के 

प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : केंद्र शासनाच्या माध्यमातुन प्रत्येक घरामध्ये गॅस पोचविण्याची योजना आहे. आर्थिक कारणांमुळे कोणीही गॅस जोडणीपासुन वंचित राहु नये यासाठी केँद्र शासनाच्या माध्यमातून उज्वला ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शासनाच्या उज्वला योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घेऊन आपल्या घरामध्ये गॅस जोड घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे पुणे विभागाचे संचालक एस.एस. सोनटक्के यांनी केले.

भादलवाडी(ता.इंदापुर) येथे उज्वला दिनानिमित्त प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती महिला, अंत्योदय रेशनकार्ड, आदी विभागातील लाभार्थ्यांना भिगवण येथील गिरीजा भारत गॅस एजन्सीच्या वतीने गॅस जोड देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोंधवडी(ता.इंदापुर) गावच्या संरपच राणी बंडगर, गिरिजा भारत गॅसच्या संचालिका अनुष्का भरणे, माजी सरपंच नानासाहेब बंडगर, ज्ञानेश्वर मारकड, आबा चितळकर उपस्थित होते.

गिरीजा भारत गॅसच्या संचालिका अनुष्का भरणे म्हणाल्या, अनेक घरांमध्ये गॅसचा वापर हा पहिल्यांदाच होत आहे. अशावेळी मोठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. घरामध्ये गॅसचा वापर करीत असताना गॅस सिलिंडरच्या आजूबाजूला रॉकेलचा डबा, रिकामे खोके, रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या इत्यादी ज्वलनशील वस्तू ठेवू नयेत. गॅस शेगडीवरील काम पूर्ण झाल्यावर गॅस-सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करावा. गॅस शेगडीच्या रबरी नळीची नियमित तपासणी करून घ्यावी व गॅसचा किंचित जरी वास येत असल्यास गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करून गॅस कंपनीच्या मेकॅनिकला बोलावून दोष दुरुस्ती करून घ्यावी. गॅसच्या गळतीबाबत व अन्य कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी गॅस कंपनीला तात्काळ कळवावे. 

गिरीजा भारत गॅस एजन्सीच्या वतीने पहिल्यादाच गॅसचा वापर करणाऱ्या महिलांना गॅस हाताळणी विषयी महत्वाच्या सुचनाही देण्यात आल्या. कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री उज्ववा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यता आले. प्रास्ताविक अनिकेत भरणे यांनी केले. सूत्रसंचालन काशिनाथ सोलनकर यांनी केले आभार धनाजी थोरात यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT