पुणे

#PMCIssue अतिक्रमणांचे चौकीदार!

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील रस्तेही अनधिकृत हातगाडी, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारीच या अतिक्रमणांचे ‘चौकीदार’ असून, यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. 

स्वच्छ अभियानातून पदरी अपयश आल्यानंतर आता पुन्हा या स्पर्धेत सरस ठरण्यासाठी उपाययोजना करीत असल्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी बुधवारी केली. केवळ अभियान म्हणून नव्हे, तर संपूर्ण शहर नेहमीच सुंदर असावे, या उद्देशाने या अभियानात उतरून पुणेकरांचा सहभाग वाढविणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले; पण वर्दळीचे प्रमुख रस्ते, चौक आणि अगदी गल्लीबोळांतही थाटलेल्या बेकायदा हातगाड्या, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांवरील कारवाईबाबत आयुक्तांनी ‘ब्र’ही काढला नाही. महापालिका प्रशासनाचा काणाडोळा होत असल्याने सूंपर्ण शहराला अतिक्रमणांनी व्यापल्याचे चित्र आहे. त्यावर ठोस उपाय आखण्याऐवजी महापालिका आता पुन्हा स्वच्छ अभियानाच्या नावाने तोंडदेखलेपणा करीत असल्याचे शहराच्या प्रमुख भागातील अतिक्रमणांवरून दिसून येत आहे. 

रस्त्यांगलतचे पदपथ पादचाऱ्यांकरिताच आहेत का, याचा अंदाज ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी विविध भागांची पाहणी करून घेतला. तेव्हा, पदपथ कुठे आहेत, असा प्रश्‍न उभा ठाकला. 

कारवाई का होत नाही ? 
अतिक्रमणांवर नियमित केल्या जाणाऱ्या कारवाईची आकडेवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून रोजच्या रोज मांडली जाते. या लोकांना दंडीही ठोठावल्याचे सांगितले जाते. या उपायानंतरही रस्त्यावरील अतिक्रमणे कमी होत नाहीत. कारण बहुतांशी बेकायदा व्यावसायिकांना नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे. त्यामुळे जागा मिळेल तिथे दुकाने मांडण्यात येतात. या व्यावसायिकांकडून चिरीमिरी घेत, बेकायदा व्यावसायाला बळ देण्याचे धाडस अधिकारी करीत आहेत. 

अशी आहेत दुकाने 
सकाळी अकरा वाजेपर्यंत - नाष्टा आण चहा विक्रेते (शिवाजी रस्ता, गणेश रस्ता, केवळ रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसर)
दुपारनंतर - खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रेते (लिंबू सरबत, नीरा, वडापाव, फळ विक्रेते-बहुतांशी रस्ते) 
सायंकाळी - भेळ, कच्ची दाबेली अशा पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या

दुकानांचे दुष्परिणाम 
  वाहतुकीला अडथळा. 
  ग्राहकांची वाहने रस्त्यावरच 
  पादचाऱ्यांचे विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचे हाल
  खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील कचरा रस्त्यावर
  रस्त्यावरच पाणी टाकल्याने दुर्गंधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT