Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation Sakal
पुणे

Property Seal : थकबाकी न भरल्याने केंद्रीय मंत्र्याची मिळकत सील

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाच्या नावाने असलेल्या मिळकतीचा ३ कोटी ७७ लाख रुपयांची मिळकतकराची थकबाकी असल्याने या ठिकाणी असणारे हॉटेल आज महापालिकेने सील केले. त्यामुळे महापालिकेच्या या धडक कारवाईचा राजकीय लोकांनाही दणका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून थकबाकी वसुलीवर जोर देण्यात आला आहे. पाच पथकांद्वारे शहराच्या विविध भागात थकबाकी न भरणाऱ्या व्यावसायिक मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बँड वाजवून थकबाकी वसूल करण्यावर भर दिला जात आहे.

शिवाजीनगर विभागाच्या हद्दीत डेक्कन कॉर्नर येथे एक मॉल आहे. या मॉलची एकूण ५ कोटी ६० लाख रुपये थकबाकी होती, त्यापैकी १ कोटी ४० लाख रुपये एका मजल्याची थकबाकी संबंधितांनी भरली. त्यानंतर वरच्या दोन मजल्यांची ३ कोटी ७७ कोटी थकबाकी भरावी यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. पण संबंधितांकडून त्यास दाद दिली नव्हती. त्यामुळे आज महापालिकेच्या पथकाने ही मिळकत सील केली आहे.

मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘आज दिवसभरात एकूण १६ मिळकती सील करून ८ कोटी रुपये वसूल केले आहेत. त्यापैकी मॉलमधील हॉटेलची ३ कोटी ७७ थकबाकी असल्याने हॉटेल सील केले आहे. पण त्यांनी अद्याप रक्कम भरलेली नाही.

आधी सील नंतर पटली ओळख

महापालिकेच्या पथकाने मॉलमधील हॉटेल सील केले, तो पर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना ही मिळकत कोणाची आहे याची काहीच माहिती नव्हती. मात्र, थोड्यावेळाने सील काढण्यासाठी दबाव येण्यास सुरुवात झाला. त्यावेळी ही मिळकत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाच्या नावाची असल्याचे समोर आले. पण महापालिकेने रक्कम भरल्याशिवाय सील काढणार नाही असे स्पष्ट केल्याने या कारवाईची महापालिकेत चांगलीच चर्चा रंगली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT