Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune University 
पुणे

मतदानाच्या दिवशीचे वेळापत्रकात बदलणार विद्यापीठाचे स्पष्टीकरण 

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परीक्षा असल्यास त्या पेपरच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील मतदानाच्या कार्यक्रमाचा विचार करून संबंधित परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून, त्याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या दिवशी येणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकात मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बदल करणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर पुणे विद्यापीठातही हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे, नगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांतील पुणे विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील एखादा पेपर त्या-त्या ठिकाणी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी होणार असेल, तर त्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. 

मतदानाच्या दिवशी परीक्षा आहेत का, त्यानुसार वेळापत्रकात बदल करण्यासंदर्भातील प्रक्रिया सध्या विद्यापीठात सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत वेळापत्रकातील बदलाचे तपशील दिले जाणार आहेत. सामान्यत: मतदानाच्या दिवशी असलेल्या पेपरच्या वेळापत्रकात बदल केला जातो, असे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT