पुणे

वाल्मीकीचे कारुण्य हे साहित्य निर्मितीचा आत्मा- डॉ. ससाणे

कृष्णकांत कोबल

मांजरी - मी कवी नसलो तरी माणूस नक्कीच आहे. साहित्य समूहचिंतक असले पाहिजे. वाल्मिकी साहित्य निर्मतीचा आरंभबिंदू असून कारुण्य हे त्यांच्या निर्मितीचा आत्मा आहे. तोच प्रवाह आजच्या कवि पर्यंत आला असून कवींनी वाल्मीकींचा शब्दयज्ञ समृद्ध करावा, असे मत प्रा. डॉ. प्रवीण ससाणे यांनी व्यक्त केले. 

साहित्य सम्राट पुणे संस्थेच्या ९९व्या कविसंमेलनाचे आयोजन लोहिया उद्यान हडपसर येथे महानगर पालिकेच्या साहित्यिक कट्ट्यावर पार पडले.त्यावेळी कविसंमेलनाध्यक्ष ससाणे बोलत होते. या कविसंमेलनात तरी आम्ही बोलू नये चे निर्माते अप्पा सोनवणे, एस. जी. फिल्मचे राहुल जाधव, फिल्म निर्माते बी. डी. गायकवाड, माळसाकांत फिल्मचे काळूराम राजगुरु, सिनेकलावंत ज्योती घुले आणि प्रदीप पानसरे उपस्थित होते. 

डॉ. ससाणे म्हणाले, "रामायणात रामाचा गुणगौरव नाही तर सीतेच्या वेदनेची करुण कहाणी वाल्मिकींनी मांडली आहे. महाभारतातील अश्वथामाची वेदना आजही भळभळत आहे. युद्ध हे प्रत्येकाला लढायचे असते सीतेचे युद्धच वाल्मिकीने मांडले आहे.'' 

यावेळी आयोजित कविसंमेलनात बडधे महाराज, नानाभाऊ माळी, अनंत राऊत, प्रल्हाद शिंदे, बा. ह. मगदूम, गणेश पुंडे, नकुसा लोखंडे, कविता काळे, पद्मजा देशमुख, शरयू पवार, विनोद ताम्हाणे, गौरव नेवसे, शौकत मुलाणी, दत्तात्रय कुलकर्णी, डॉ.शुभा लोंढे, अँड. संध्या गोळे यांनी आपल्या काव्यरचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रल्हाद शिंदे यांचा ६५ वा वाढदिवस साजरा केला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी येणाऱ्या शतक महोत्सवी कार्यकर्माची रूपरेषा प्रास्ताविकात मांडली. सुत्रसंचालन रानकवी वनशिव यांनी तर आभार कवी सूर्यकांत नामुगडे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT