kartule
kartule 
पुणे

 पुणेकरांनो, या प्रसिद्ध रानभाज्या महोत्सवाबाबत घेतलाय हा निर्णय 

राजेंद्र लोथे

चास (पुणे) : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील डेहणे येथे शासनाच्या आदेशानुसार रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येणार होता, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रानभाज्या परिपक्व न झाल्याने सद्यस्थितीत रानभाज्या महोत्सव घेणे शक्य नसल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्याबाबत शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. तसेच, रानभाज्या महोत्सव आयोजित करून प्रामुख्याने आदिवासी भागातील नागरिकांना बाजारपोठ उपलब्ध करून देण्याबरोबच त्यांना रोजगार उपलब्ध करून देता येईल, हा त्या मागचा उद्देश होता. मात्र, या विषयाला अनुसरून रानभाज्या महोत्सवाचे खेड तालुक्यातील डेहणे येथे तालुका कृषी विभगाच्या वतीने आयोजन करण्यात येणार होते. परंतु, या भागातील शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता बहुतेक मागणी असणाऱ्या रानभाज्या या परिपक्व व विक्रियोग्य आॅक्टेबर ते नोव्हेंबर या महिन्यात उपलब्ध होतात. तसेच, पाऊस कमी असल्याने रानभाज्या या कोवळ्या व अपरिपक्व अवस्थेत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

या शिवाय खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोविड रूग्ण सापडल्याने अनेक ठिकाणी कंटोन्मेंट झोन- अती संरक्षित क्षेत्र म्हणून घोषीत केलेले आहे. खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असून रानभाज्या महोत्सवास महसूल विभाग व ग्रामपंचायत व स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून परवानगी दिली जाणार नाही. या परिस्थितीमध्ये रानभाज्या महोत्सव आयोजित करणे संयुक्तीक राहणार नसल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने विभागीय कृषी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT