Vehicle-Parking
Vehicle-Parking 
पुणे

वाहनतळांवरील दादागिरीला चाप

सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेचे वाहनतळ भाडेतत्त्वावर घेऊन धाकदपटशा करीत वाहनचालकांना लुबाडणाऱ्या ठेकेदारांना वठणीवर आणण्यासाठी आता पावले उचलली जाणार आहेत. वाहनतळ व्यवस्थापनाच्या कामकाजावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र धोरण आखण्यात येणार असून, अव्वाच्या सव्वा पैसे घेणाऱ्या वाहनतळ व्यवस्थापनाविरोधात कारवाई होणार आहे. महापालिकेच्या सर्व वाहनतळांची तपासणी करून कार्यवाही करण्याचा आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील हमालवाडा येथील शिवाजीराव आढाव वाहनतळावर पोलिस अधिकाऱ्यालाच मारहाण झाल्याने महापालिका प्रशासन जागे झाले आहे. दरम्यान, आढाव वाहनतळाचे कंत्राटही रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

आढाव वाहनतळावर १० ऐवजी ३० रुपयांसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्याला वाहनतळावरील गुंडांनी मारहाण करण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. याबाबत विश्रामबाग पोलिसांनी संबंधित गुंड आणि कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर शहरांतील महापालिकेच्या वाहनतळांवरील जादा दर आकारणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या वाहनतळांवर जादा दर आकारणीबरोबरच मासिक पासही ४०० रुपयांऐवजी २ ते ३ हजार रुपयांना आकारले जातात, अशाही तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत.

कारवाई कडक हवी 
आढाव वाहनतळाचे कंत्राट निलंबित करावे, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार प्रशासनाने कारवाईस सुरवात केली. परंतु, स्थानिक नगरसेवक राजेश येनपुरे, हेमंत रासने यांनी निलंबन ही सौम्य कारवाई आहे. त्याऐवजी कंत्राट रद्द करावे, अशी आग्रही भूमिका घेतली आणि आयुक्तांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार कंत्राट रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

शहरातील महापालिकेच्या कोणत्याही वाहनतळांवर जादा पैसे आकारण्यात येऊ नयेत, यासाठी सातत्याने देखरेख करून उपाययोजना करण्यासाठीचा आराखडा येत्या तीन दिवसांत तयार होईल. तसेच दरपत्रक दर्शनी भागात दिसेल, अशा पद्धतीने लावण्याचे आदेश पुन्हा दिले जातील. 
- अनिल मुळे, मालमत्ता व्यवस्थापन विभाग प्रमुख, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT