पुणे

लग्नाचा बहाणा करून तरुणीची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

पुणे : उद्योजक तरुणीशी लग्नाचा बहाणा करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याबरोबर तिची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी 29 वर्षीय तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमित रंजन महापात्रा (वय 30, रा. बाणेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अमितची ओळख झाली होती. दरम्यान अमितने फिर्यादीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत तिला मंगळसूत्र घालून व कुंकू लावून लग्न केल्याचा बनाव रचला. 

त्यानंतर तिला, त्याच्या बाणेर येथील घरी व मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीकडून व्यवसाय सुरू करण्याच्या बहाण्याने चार लाख रुपये घेतले. त्यानंतर तरुणीस शिवीगाळ करत तिला त्रास देण्यास सुरवात केली. या प्रकरणी तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध बलात्कार व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT