Vidhan Sabha 2019 mp sunny deol rally for yogesh tilekar hadapsar pune
Vidhan Sabha 2019 mp sunny deol rally for yogesh tilekar hadapsar pune 
पुणे

आमदार योगेश टिळेकर जिंदाबाद थे, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेंगे : सनी देओल

सकाळ वृत्तसेवा

मांजरी : महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ हडपसर मतदार संघात आज प्रसिद्ध सिनेअभिनेता खासदार सनी  देओल यांच्या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला तरुणांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीतील गर्दी पाहताच देओल यांनी "योगेश टिळेकर जिंदाबाद थे, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगे' असा आपल्याच एका चित्रपटातील डायलॉग बोलून रॅलीतील सहभागींचा उत्साह वाढवला. 

भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारासाठी अभिनेते खासदार सनी देओल यांनी मुंढवा येथील लोणकर विद्यालया पासून रॅलीला सुरुवात केली. ही रॅली केशवनगर, मांजरी मार्गे महादेवनगर, पंधरा नंबर, आकाशवाणी, गाडीतळ, सातववाडी, काळेपडळ, ससाणेनगर, हडपसर गाव, मगरपट्टा या मार्गाने पुढे जाऊन शंकर मठ येथे सांगता झाली. महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रेल्वेच्या मार्गावर दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. खासदार देओल व आमदार टिळेकर यांनी रॅलीदरम्यान नागरिकांना अभिवादन करीत निवडून देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी साडेसतरानळी परिसरात उमेदवार टिळेकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या पदयात्रेचे आयोजन केले होते. नगरसेवक मारुती तुपे, प्राची अल्हाट, संगीता ठोसर, प्रमोद भानगिरे, विकास रासकर विराज तुपे, भूषण तुपे, रवि तुपे, विजय देशमुख, डॉ. बाळासाहेब बहिरट, सत्यजित तुपे, राहुल शिंदे, दिलीप तुपे, सुनील धुमाळ, महेंद्र तुपे, समीर तुपे, वीरभद्र गाभणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

उमेदवार टिळेकर म्हणाले,"मला उत्तरोत्तर मतदार व नागरिकांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. त्यामुळे महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साहही दुणावत आहे. मी केलेली विकासकामे आणि नागरिकांकडून मिळणारे प्रेम व आशिर्वादच मला यशस्वी करतील, असा मला ठाम विश्वास आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT