narendra modi pune whole speech in marathi
narendra modi pune whole speech in marathi 
पुणे

Vidhan Sabha 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुण्यातील भाषण, वाचा जसेच्या तसे

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 :
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. 17) सायंकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आले अन त्यानंतर अवघ्या 6 मिनिटांत त्यांनी भाषणाला सुरवात केली. सुमारे 31 मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले........

मराठी भाषेतून सुरवात करताना, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणेकरांनो नमस्कार... "कसे काय पुणेकर, बरं आहे का' ..... विद्यानगरी... संस्कृतीची नगरी असलेल्या पुण्यानं मला पुण्याने कायमच भरभरून दिलं आहे.... गेल्या वेळच्या सभेनंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही प्रचंड जनादेश दिला आहे... म्हणूनच पुणेकरांना मी वारंवार नमन करतो.... देश घडविताना हा जनादेश अत्यंत महत्वाचा असतो.

पुणे हे देशातील असं केंद्र आहे की येथे कायमच देशाचे राजकारण, ध्येय्य-धोरणे यांची चिकित्सा होते... देशातील स्टार्टअपचं पुणं हे केंद्र आहे...संस्कार आणि स्किल पण देतात... छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा- सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या समाज सुधारकांबरोबरच चाफेकर बंधु, राजगुरू, उमाजी नाईक, असे अनेक क्रांतिवीर येथे झाले आहेत...अन्‌ त्यांच्या पदस्पर्शानेही ही भूमी पावन झाली आहे.... म्हणूनच नवा भारत, नवी नीती यांची चर्चा येथे करायची आहे... जगात नवे बदल वेगाने होत आहेत... त्या साठी सशक्त सरकार पाहिजे....5 वर्षांसाठी सरकार निवडले आहे... अजून तर 5 माहिनेही झालेले नाहीत....या 120- 125 दिवसांत नव्या भारताचा अनुभव येत आहे का ? निर्णयात ताकद दिसते ? देश ते विदेश नितींमध्ये ताकद दिसत आहे... (यावेळी हो-हो चा प्रचंड जयघोष) "हाऊ दि मोदी...' असं जगात म्हणतात... (मोदी....मोदी जयघोष)...याच कारण काय ? पुणेकर तर हुशार आहे...पण उत्तर चुकीचं आहे... 130 कोटी जनतेमुळेच जगात भारताची दखल घेतली जात आहे.... या स्टेजच्या मागे मोठा जनादेश आहे... जगातले बलशाही नेते माझ्याशी मिळवतात, पण त्यांना दिसत असतात ते 130 कोटींच्या नागरिकांचा जनादेश म्हणूनच ते माझ्याशी शेकहॅंड करतात... लोकमान्य टिळक यांनी "स्वराज्य'चा नारा देत भारतीयांना एकत्र आणले, आज आता आपल्याला "सुराज्य' साठी काही करायचं आहे....

भारताच्या विकासात प्रत्येक भारतीय सहभागी व्हायला पाहिजे... आर्टिकल 370...जम्मू, काश्‍मीर, लडाखच्या विकासात 70 वर्षांपासून अडथळा होते....तो दूर करण्याची चर्चा तर खूप झाली...पण (प्रचंड टाळ्या आणि मोदी-मोदी घोषणा झाल्यामुळे मोदींनी माईक सोडून पुढे स्टेजवर आले आणि लवून नमस्कार केला.)..भारतात पहिल्यांदाच एवढे बहुमत कोणत्या राजकीय पक्षाला मिळालं आहे का, मग यंदा वेगळे काय ? आता हा भारत संघटीत आहे....हा बदलणारा भारत आहे...आता कोणी भारताकडे डोळे वटारू शकत नाही....370 कलम तर प्रतिकात्मक आहे... ते दूर केल्यामुळे विकासाची गंगोत्री वाहू लागणार आहे.... हा निर्णय घेणे सोपे नव्हते....पण, नव्याने घडणाऱ्या भारतामुळे हे शक्‍य झालं आहे....आता आपल्याला नव्या आव्हानांना सामोरे जताना काही सवयीही बदलाव्या लागणार आहे.... तंत्रज्ञान बदलत आहे. कौशल्य विकास करून वेगाने पुढे जायचे आहे...नवी अर्थव्यवस्था करायची आहे...युवकांना सांगतो की, नजीकच्या काळात खूप "स्कोप' आहे...भारतात लोकांना यायचे आहे....भारतात मोठी गुंतवणूक करायची आहे... कॉर्पोरेट करात सूट दिल्यामुळे उद्योग विस्तारत आहेत... विकासासाठी नवी पावले उचलत आहोत... पायाभूत सुविधांसाठी तब्बल 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे... पुण्यासारख्या शहरांना त्याचा फायदा होईल... पुण्याची कनेक्‍टिव्हिटी सशक्त होईल, मेट्रो मार्ग विस्तारत आहे...त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल... रेल्वे मध्येही सुधारणा सुरू झाल्या आहेत. .. एअर कनेक्‍टिव्हिटीसाठी पुण्यासह महाराष्ट्रातील 9 शहरे जोडली जात आहेत.

भारतकडे डेटाची ताकद देखील आहे... भारतीय रूपे कार्ड 9 कोटी जनता वापरते. त्यापैकी 2 कोटी कार्ड तर महाराष्ट्रतच आहेत. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थे आपलं स्वप्न साकारणार आहे...काहींना अवघड वाटते कारण त्यांना फक्त आकडे दिसतात...तर त्यांना मी हिशेबच देतो...तब्बल 60 वर्षांनंतर 2007 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनची झाली. त्यानंतर 8 वर्षानंतर आणखी 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था झाली आणि त्यानंतर 4 वर्षांनंतर अर्थव्यवस्थेचा आकार आखणी ट्रिलियनने वाढला. त्या मुळेच 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट लवकरच साध्य होईल... त्यातूनच आशा- आकांक्षा साध्य होतील... "हम मख्खन पे लकीर नाही, पत्थर पार लकीर निकलनो वाले है........'

अर्थव्यवस्थेसाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.... मध्यमवर्गीयांचा त्यात सहभाग खूप मोलाचा असतो, मागच्या निवडणुकीनंतर दिल्ली ते मुंबईपर्यंत कोण कोण...आहे, त्यांना जेलपर्यंत घेऊन गेलो आणि आता नवे सरकार आल्यावर त्यांना जेलमध्ये पाठविणार.... हा सिलसिला येथे थांबणार नाही....तर लुटलेला प्रत्येक पैसा वसूल केल्याशिवाय हा सेवक शांत बसणार नाही... देवेंद्र ने चांगले सरकार गेल्या पाच वर्षांत चालविले आहे. 21 ऑक्‍टोबरला सोमवार आहे... रविवारची सुट्टी धरून सोमवारी दोन दिवसांसाठी महाबळेश्वर, गोव्यात फिरायला, मुंबईत भावाला भेटायला जावूनका...बूथ सोडू नका, लोकशाहीचा संस्कार विसरू नका. मतदान हे लोकशाहीतील पवित्र कर्तव्य आहे... गेल्या लोकसभा निवडणुकीला झालेला मतदानाचा विक्रम तोडा...महिलांचे मतदान जास्त करा...2 - 3 दिवस राहिले आहेत.... महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आवश्‍यक आहे.... "पुन्हा आणू या आपले सरकार' !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT