ramesh-bagwe
ramesh-bagwe 
पुणे

Vidhansabha 2019 : आठही जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आणणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार काँग्रेस भवनमध्ये झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी बुधवारी केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 

रमेश बागवे म्हणाले, ‘‘आघाडीचा धर्म पाळून काँग्रेस - राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे जो कोणी उमेदवार निवडणुकीसाठी उभा असेल त्यास निवडून आणण्याची जबाबदारी आपण सर्वांनी एकत्रितपणे घ्यावी. काँग्रेसच्या या कठीण काळामध्ये सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.’’ 

बैठकीला आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, तसेच अभय छाजेड, अरविंद शिंदे, रशिद शेख, सदानंद शेट्टी, नीता रजपूत हे प्रमुख नेते उपस्थित होते. या प्रमुखांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील भाजप शिवसेना सरकारला आलेले अपयश, भ्रष्टाचार, तसेच पुणे महापालिकेतील भ्रष्टाचार व विकासाच्या नियोजनाचा अभाव या मुद्दांवर निवडणूक केंद्रित केली पाहिजे, असा निर्णय घेतला.

निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे शिष्टाचार समिती, सोशल मीडिया समिती, प्रसिद्धी विभाग, कंट्रोल रूम, वक्ते समन्वयक, रणनीती व व्यूहरचना समिती, कायदा सल्लागार समिती इत्यादी समित्या कार्यान्वित करण्याचे ठरविले. तसेच सर्व समविचारी मित्र पक्षांशी बोलणी करून बैठकाही घेण्यात येणार आहेत. 
या बैठकीस अजित दरेकर, अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर, मनीष आनंद, दत्ता बहिरट, सुजाता शेट्टी, मेहबूब नदाफ, रमेश अय्यर, सचिन आडेकर, सुनील शिंदे, वाल्मीक जगताप, द. स. पोळेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT