asteroids sakal
पुणे

Asteroids : विद्या प्रतिष्ठानच्या चार विद्यार्थ्यांनी शोधले चार लघुग्रह

ग्रामीण भागातील मुलांमधील जिज्ञासू व संशोधनवृत्ती अत्युच्च दर्जाची असून आकाशमालेतील लघुग्रहांचा शोध लावण्याची किमया बारामतीतील चार विद्यार्थ्यांनी करुन दाखवली आहे.

मिलिंद संगई,

ग्रामीण भागातील मुलांमधील जिज्ञासू व संशोधनवृत्ती अत्युच्च दर्जाची असून आकाशमालेतील लघुग्रहांचा शोध लावण्याची किमया बारामतीतील चार विद्यार्थ्यांनी करुन दाखवली आहे.

बारामती - ग्रामीण भागातील मुलांमधील जिज्ञासू व संशोधनवृत्ती अत्युच्च दर्जाची असून आकाशमालेतील लघुग्रहांचा शोध लावण्याची किमया बारामतीतील चार विद्यार्थ्यांनी करुन दाखवली आहे.

विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदीर (पिंपळी) शाळेतील मधुरा मिलिंद मोकाशी, त्रिशा महेश रोकडे, ओजस रमेश देशपांडे, वेद वैभव टकले या चार विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था नासा सोबत काम करत ही कामगिरी करुन दाखवली आहे.

होमी लॅब व इंटरनॅशनल अँस्ट्रोनॉमिकल सर्च कोलॅब्रेशन (IASC) यांनी नासाच्या सिटीझन सायन्स प्रोजेक्ट अंतर्गत 21 ऑक्टोबर 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले. पृथ्वीच्या जवळ असलेल्या खगोलीय वस्तू व लघुग्रह कक्षेतील वस्तू यांचे निरिक्षण करण्याचे तसेच त्याचे विश्लेषण या बाबी विद्यार्थ्यांना शिकविल्या गेल्या.

विद्या प्रतिष्ठानच्या मधुरा मिलिंद मोकाशी, त्रिशा महेश रोकडे, ओजस रमेश देशपांडे, वेद वैभव टकले या चार विद्यार्थ्यांनी कलाम अँस्ट्रॉईड सर्च प्रोग्रॅममध्ये सहभागी होत चार नवीन लघुग्रह शोधून काढलेले आहेत.

या विद्यार्थ्यांनी शोधलेल्या लघुग्रहांचे आगामी पाच वर्षे निरिक्षण केले जाणार आहे. पाच वर्षात जर हे लघुग्रह कायम स्थितीत राहिले तर त्यांचे नामकरण करुन त्याला अधिकृत मान्यता इंटरनॅशनल अँस्ट्रोनॉमिकल युनियन देणार आहे.

या प्रकल्पामध्ये नऊ देशातील 105 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या विद्यार्थ्यांना अत्युच्च दर्जाची साधनसामग्री या संशोधन प्रक्रीयेसाठी देण्यात आलेली होती.

मंगळ आणि जुपिटर या दोन ग्रहांच्या मधल्या भागातील हे लघुग्रह असल्याचे प्राथमिक संशोधनात दिसले आहे. होमी लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सृजन पाल सिंह यांनी या विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे कौतुक केलेले आहे. विद्यार्थ्यांनी संपूर्णपणे ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे हे काम पूर्ण केलेले आहे. शाळेच्या प्राचार्या के.ए. बारवकर यांनी या संशोधनामुळे मुलांमधील जिज्ञासू वृत्ती अधिक वृध्दींगत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

आयुष्यात मिळणारी दुर्मिळ संधी....

नासा व होमी लॅब सोबत पृथ्वीजवळील घटक व लघुग्रह यांचा अभ्यास करण्यास मिळणे ही आयुष्यातील एक वेगळी दुर्मिळ संधी बारामतीकर चार विद्यार्थ्यांना मिळाली. अमेरिकेतील हवाई बेटावरील अत्युच्च क्षमतेच्या दुर्बिणीने अंतराळाची टीपलेली छायाचित्रे या मुलांना मिळाली व त्यावर त्यांना अभ्यास करता आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT