पुणे

पाच रंगकर्मींना शिष्यवृत्ती प्रदान 

सकाळवृत्तसेवा

पुणे - रंगभूमीची सेवा करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या युवा प्रयोगात्मक रंगकर्मींना मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारी "विनोद दोशी व तेंडुलकर- दुबे' शिष्यवृत्ती याहीवर्षी पाच रंगकर्मींना प्रदान करण्यात आली. रवी चौधरी (पुणे), रसिका आगाशे (मुंबई) आणि ध्वनी विज (नवी दिल्ली) यांना विनोद दोशी शिष्यवृत्ती, तर "तेंडुलकर-दुबे शिष्यवृत्ती' ही कौस्तुभ नाईक (गोवा) आणि गुरलीन जज (लखनौ) यांना प्रदान करण्यात आली. 

प्रसिद्ध अभिनेत्या, दिग्दर्शिका आणि बंगळूरस्थित रंगशंकरा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अरुंधती नाग यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या वेळी साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे विश्वस्त अशोक कुलकर्णी, प्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर, विनोद व सरयू दोशी फाउंडेशनच्या विश्वस्त सरयू दोशी, नाटककार मोहित टाकळकर उपस्थित होते. प्रत्येकी एक लाख रुपये, असे शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. शिष्यवृत्ती कशी खर्च करायची, याचा निर्णय हा सर्वस्वी त्या रंगकर्मीवर अवलंबून असतो, हे या शिष्यवृत्तीचे वैशिष्ट्य आहे. 

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने प्रायोगिक रंगभूमीवरील ताकदीची अधिकाधिक नाटके रसिक प्रेक्षकांसमोर यावीत, नवोदित कलाकार समोर यावेत, त्यांना प्रोत्साहन, हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दहा वर्षांपासून विनोद दोशी नाट्यमहोत्सव आयोजित केला जातो. गेल्या वर्षीपासून हा महोत्सव सारंग नाट्यमहोत्सव या नवीन नावासह कलाकार आणि रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

सारंग नाट्यमहोत्सव आजपासून 
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आजपासून सारंग नाट्यमहोत्सवाला सुरुवात होईल. यादरम्यान क्रॉसिंग टू तालिकोटा या गिरीश कार्नाड लिखित नाटक, सचिन शिंदे दिग्दर्शित हंडाभर चांदण्या (मराठी), नील चौधरी दिग्दर्शित रिहला (हिंदी), ज्योती डोग्रा दिग्दर्शित ब्लॅक होल (इंग्रजी, हिंदी) आणि जॉय मैसनाम दिग्दर्शित अंधा युग (हिंदी) आदी नाटके सादर केली जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT