Criminal
Criminal sakal
पुणे

Vishrantwadi Crime : गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी - विश्रांतवाडीत गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली.

पुणे शहर पोलीस आयुक्तांनी शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवायांसह कायदेशीर उपाययोजना सुरू केलेली आहे.

विश्रांतवाडी येथील शांतीनगर परिसरात रिक्षा व दुचाकीची मोडतोड करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या फरार गुन्हेगारांना विश्रांतवाडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. या आरोपींची दहशत मोडीत काढण्यासाठी त्यांची शांतीनगर परिसरातून धिंड काढण्यात आली.

त्यामुळे हे गुन्हेगार पुन्हा अशी गंभीर गुन्ह्याची कृती करायला धजवणार नाहीत यासाठी ही उपाययोजना पुणे शहर पोलिसांतर्फे सुरू करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीसनिरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक लहू सातपुते यांच्यासह विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.

सराईत गुन्हेगार व आरोपींची दहशत मोडीत काढण्यासाठी विश्रांतवाडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे शांतीनगर, तसेच विश्रांतवाडी परिसरातून स्वागत करण्यात आलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: आज तुमच्या यादीत ठेवा 'हे' 10 शेअर्स; देतील जबरदस्त परतावा

RCB Troll : बंगळुरूला जमणार नाही... CSKच्या स्टार खेळाडूने रेल्वेचा फोटो टाकून RCBला का केलं ट्रोल?

Pune Rain: पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, दुर्गम भागात ओढ्यांना पूर

Yoga Tips : महिलांच्या प्रत्येक समस्येवर रामबाण आहे बद्धकोणासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Brain Eating Amoeba: मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला ५ वर्षीय मुलीचा जीव, जाणून घ्या Naegleria Fowleri बद्दल सविस्तर

SCROLL FOR NEXT