Water-Supply
Water-Supply 
पुणे

वाघोलीकरांचा पाणीप्रश्‍न सुटणार

सकाळवृत्तसेवा

वाघोली - वाघोलीच्या वाढीव पाणी योजनेची निविदा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नुकतीच प्रसिद्ध केली. या योजनेमुळे परिसरातील सुमारे एक लाख ३५ हजार लोकसंख्येला पाणी मिळणार असून, यामुळे वाघोलीचा पाणीप्रश्न सुटणार आहे. 

या योजनेसाठी सुमारे २२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. १६ ऑगस्ट रोजी ही निविदा खुली करण्यात येणार असून, वर्क ऑर्डर दिल्यानंतर वर्षभरात हे काम पूर्ण केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत वढू खुर्द येथील बंधाऱ्यातून पाणी आणले जाणार असून, बकोरी रस्त्यावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेतून सध्या नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र ही योजना कमी क्षमतेची असल्याने वाढीव लोकसंख्येला पाणी मिळत नाही. यामुळे ९० टक्के सोसायटीधारकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे ही योजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पीएमआरडीएकडे या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे पीएमआरडीएने या योजनेसाठी तरतूद केली आहे. दरम्यान, वाघोलीत विकास कामे होत नसल्याने उपसरपंच संदीप सातव यांनी २३ जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. 

वाघोलीचे उपसरपंच संदीप सातव, म्‍हणाले की, पाणी योजनेचे काम मार्गी लागत आहे. अन्य विकास कामांबाबत पीएमआरडीएशी चर्चा सुरू आहे. ही चर्चा यशस्वी झाली नाही, तर मी बेमुदत उपोषणावर ठाम आहे. 

रकमेबाबत  ग्रामसभेत होणार निर्णय
पाणी योजनेसाठी एकूण खर्चाच्या ३० टक्के रक्कम ग्रामपंचायतीने भरावी, असे  पीएमआरडीएने सांगितले होते. मात्र ग्रामपंचायतीने एवढी रक्कम देण्यास विरोध केला आहे. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत या योजनेसाठी किती रक्कम द्याची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT