pune zp
pune zp 
पुणे

"डीबीटी'चे लाभधारक मंजुरीच्या प्रतीक्षेत 

महेंद्र शिंदे

कडूस (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेमार्फत "डीबीटी'अंतर्गत देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभांच्या योजनांच्या प्रस्ताव मंजुरी व लाभधारक निवडीच्या प्रक्रियेला जिल्हास्तरावर विलंब झाला आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी पूर्ण होणाऱ्या प्रक्रियेला यंदा डिसेंबरचा दुसरा आठवडा संपत आला तरी, अंतिम स्वरूप मिळाले नाही. या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाजकल्याण, पशुसंवर्धन आणि कृषी विभागाकडून दरवर्षी "डीबीटी'अंतर्गत विविध वस्तूंसाठी अनुदान दिले जाते. शेतकरी, तरुण आणि विशेषत: महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही योजना जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. इच्छुक लाभधारकांनी 5 जुलै ते 25 ऑगस्ट या काळात आवश्‍यक कागदपत्रांसह तालुका पंचायत समितीकडे अर्ज जमा केले आहेत. 

या अर्जांची पंचायत समितीने छाननी करून लाभधारक निवड व अंतिम मंजुरी प्रक्रियेसाठी तयार केलेले प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवले. निवड झालेल्या लाभधारकाला स्वतः वस्तूची खरेदी करावी लागते. त्याचे बिल आवश्‍यक कागदपत्रांसह संबंधित विभागाकडे पुन्हा जमा करावे लागणार आहे. त्यानंतर त्याच्या बॅंक खात्यात थेट लाभाची रक्कम जमा होणार आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून दिवाळीपूर्वी लाभधारक निवड होते; परंतु यंदा डिसेंबर महिना सरकायला आला, तरी अजूनही लाभधारकांची निवड झालेली नाही. लाभधारक लाभाच्या प्रतीक्षेत पंचायत समितीत हेलपाटे मारीत आहेत. एक अर्ज दाखल करण्याकरिता प्रत्येक इच्छुकाला प्रत्येकी पाचशे रुपये खर्च आला आहे. चौकशी करण्यासाठी तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी व महिला पंचायत समितीत चकरा मारीत आहेत. 

खेड तालुक्‍यात कृषी, समाजकल्याण, पशुसंवर्धन आणि महिला व बालकल्याण, असे सर्व विभाग मिळून एकूण 7 हजार 456 अर्ज आले होते. जिल्हा परिषदेकडे जिल्हाभरातून आलेल्या अर्जाची संख्या तर खूपच मोठी आहे. खेड पंचायत समितीकडे आलेल्या अर्जांपैकी कृषी विभागाकडे एकूण 3 हजार 511, पशुसंवर्धन विभागात सर्व योजना मिळून 480 लाभधारकांचे उद्दिष्ट असताना 1 हजार 67, महिला व बालकल्याण विभागात एकूण 1 हजार 643, समाज कल्याण विभागाकडे वैयक्तिक व सार्वजनिक लाभ योजनांसाठी एकूण 1 हजार 169 अर्ज आले आहेत. 

शेतकऱ्यांनी शेतात पिके घेतली आहेत. विहिरींचे पाणी खोल जाऊ लागले आहे. पाइप किंवा डिझेल इंजिनची आताच गरज आहे. अर्ज जमा केलेत, पण लाभ मिळत नाही. वेळेत लाभ मिळत नसेल तर या योजनांचा काय फायदा? 
- दादाभाऊ ढमाले, 
शेतकरी, कडूस (ता. खेड) 


इच्छुक लाभधारकांचे अर्ज जमा केले असून, ते छाननी करून जिल्हा परिषदेकडे पाठवले आहेत. जिल्हा परिषदेत लाभधारक निवड प्रक्रिया सुरू आहे. निवड झाली की लाभधारकाला लाभ दिला जाईल व डीबीटी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. येत्या महिन्याभरात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. 
- बाळासाहेब ढवळे, 
सहायक गटविकास अधिकारी, खेड 


जिल्हा परिषदस्तरावरील लाभधारक निवड व अन्य प्रक्रिया दिवाळीपूर्वी होणे अपेक्षित होते, परंतु विधानसभा व त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे विलंब झाला. आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल व लाभधारकाला लाभ मिळेल. 
- शरद बुट्टे पाटील, 
जिल्हा परिषद सदस्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT