crime_logo
crime_logo 
पुणे

वाकड पोलिसांनी हस्तगत केले ९४४ ग्रॅम सोन्याचे दागिने 

रवींद्र जगधने

पिंपरी (पुणे) : मागील सहा महिन्यात सात सराईत सोनसाखळी चोरांना जेरबंद करत त्यांच्याकडून ९४४ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये एकुण २३ गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी दिली. 

फेब्रुवारीमध्ये हैदर जाफरीची इराणी टोळी अटक करून त्यांच्याकडे तपास करत १३ लाख ५३ हजार किमतीचे ४५१ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. तसेच एकुण दहा गुन्हे उघड झाले. जुनमध्ये नदीम उस्मानी व मोहंमद अली यांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाख ४५ हजार किमतीचे ८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तर पाच गुन्हे उघडकीस आणले. आणि या महिन्यात मध्यप्रदेशमधून विजय ऊर्फ छल्या चव्हाण, गोविंद काळे, शिवा पवार यांना अटक करून ४०१ ग्रॅम सोन्याचे दागिने व एक मोटार असा 16 लाख 33 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अशा प्रकारे एकुण २८ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

ही कारवाई पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम, अपर आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक हरिष माने, पोलिस हवालदार विवेकानंद सपकाळे, जावेद पठाण (दोघे पिंपरी पोलिस ठाणे) प्रमोद कदम, श्‍याम बाबा, नितीन गेंगजे, दादा पवार, धनराज किरनाळे, सुरेश भोसले, अशोक दुधवणे, हनुमंत राजगे, बिभीषण कन्हेरकर, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, विक्रांत गायकवाड, विक्रम कुदळ, विजय गंभिरे, अनिल महाजन, महंमद नदाफ, राजेंद्र बारशिंगे, भैरोबा यादव, सागर सूर्यवंशी, मधुकर चव्हाण, सनी गोंधळे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT